त्याकाळी डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आपण इतका रागाने तुटून पडत होता की त्यांच्या अंत्यसंस्कारालाही जाण्याची साधी सभ्यता आपण दाखवली नाही.
आणि आजचा आर्थिक गोंधळ पाहता वाटतं आपल्या भाषणांची टोनच भविष्यवाणी होती.जर 64 रुपये “रुपया पाताळात गेला” असेल,तर 90.17 रुपये म्हणजे काय?रुपया थेट स्मशानयात्रेला निघाला? तेव्हा अनुपम खेर पासून जुही चावला, विवेक अग्निहोत्री पासून अमिताभ बच्चन सगळे रुपयावर विनोदांच्या गोळ्या झाडत होते.जुही चावलाने “माझ्या अंडरवेअरचं नाव डॉलर आहे” सांगितलं होतं.अमिताभ बच्चन यांनी तर लघवीची तुलना केली होती.आणि आज? आज त्यांना बहुतेक ईडी-आयटीचा आलिंगन इतका घट्ट बसला आहे की शब्दच बाहेर येत नाहीत.

मोदीजी, आपण भारताचे पंतप्रधान आहात, शेजारच्या देशांचे ब्रँड अॅम्बेसेडर नाही.मग आज विचारलं की,रुपया 90.17 कसा गेला?
आपण नेहमीप्रमाणे “ग्लोबल सिच्युएशन, युद्ध, वातावरण, वादळ, सूर्यमालेतील ग्रहांची हालचाल” असा कारणांचा जथ्था काढणार? एके काळी आपण म्हणत होता “मी शासनात आहे, मला सगळं माहित आहे.”आता? शासनही आपलंच, सत्ता आपलीच, सर्व यंत्रणा आपलीच पण जबाबदारी मात्र कुणाचीच नाही?आपणच म्हटलं होतं “रुपया पडला म्हणजे त्या देशाचा पंतप्रधान पडला.”तर मग आज सांगा,90 रुपयाच्या खाली रुपया नव्हे,पंतप्रधान कोसळले आहेत का? की अजूनही फोटोशूटमध्ये उभे राहण्याचा प्रयत्न सुरू आहे?
पण हो, चाटणारे पत्रकार तर अजूनही म्हणत आहेत “हा देखील मास्टर स्ट्रोक!”
अहो, जर रुपया मरत असेल आणि ते मास्टर स्ट्रोक असेल, तर मग देशाचा श्वास रोखला तरी आपण त्याला योग दिन म्हणाल काय? निर्मला सीतारामन यांचे तर भारींच आहे. “रुपया कमकुवत नाही; डॉलर मजबूत आहे.”हा जोक जर अर्थशास्त्र असता, तर कॉमेडी सर्कसचा शो बंद पडला असता.दिवसाढवळ्या अर्थव्यवस्था कोसळली तरी सरकार म्हणतं,“रुपया नाही पडला, गुरुत्वाकर्षण बदललं.”मुख्यमंत्री असताना आपण म्हणत होता. “डॉलर महागला तर आमचे व्यापारी जगणार नाहीत.”आज डॉलर 90+ असूनही व्यापारी जगले आहेत की तडफडत आहेत.,की आपल्याला त्यांच्याशी बोलायलाच वेळ नाही?
आज खरी स्थिती अशी:
महागाई = उत्सव,
कर वाढला = उत्सव,
कर कमी झाला = उत्सव,
रुपया पडला = महोत्सव!
ही “सततचा उत्सव संस्कृती” म्हणजे कोणता विकास?
भिकारी वेशातला सेलिब्रेशन?
88% तेल आयात; पैसे डॉलरमध्ये.
डॉलर वाढला म्हणजे सर्व काही महाग.
भाजीपाला पर्यंत महाग.
सामान्य जनता रडतेय,
मध्यमवर्ग थेट दफनभूमीच्या शोधात.
आणि सरकार अजूनही टाळ्या वाजवतंय,“अर्थव्यवस्था मजबूत!”
Bloomberg सांगते,भारताच्या चलनाची अवस्था जगातील सर्वात वाईट. तेव्हा रुपयावर विनोद करणारे सगळे आज पाण्यात पाहिल्यासारखे शांत.
का? की आता विनोद करण्याची परवानगीही सरकारकडून घ्यावी लागते?१७ अब्ज डॉलर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून काढले.
ही अर्थव्यवस्था मजबूत?की गाळात रुतलेल्या बैलाच्या शेपटीला राष्ट्रवादाचा बोचका बांधून चालवण्याचा प्रयत्न? 2017 पासून “विकसित भारत” नावाचा खुळखुळा जनतेला दिला. स्वप्न मात्र गोड, वास्तव मात्र कडू अगदी करपलेल्या काजूप्रमाणे. 2013 मध्ये 64 रुपये झाला तेव्हा पत्रकार आक्रमक होते.आज 90 वर तेच पत्रकार पूर्ण शांत. याला म्हणतात विकास: पत्रकारितेचा अंत.नेहरूंना दररोज शिव्या घालणाऱ्यांनी लक्षात ठेवावे,त्यांच्या काळात डॉलर 3.30 रुपये होता.आपल्या काळात 90+.याला विकास म्हणायचा की नाशाचा प्रीमियम पॅकेज? मोदीजी, 2013 मध्ये आपण देशाच्या वतीने गर्जत प्रश्न विचारत होता. आज देश आपल्या वतीने प्रश्न विचारतो आहे. फरक इतकाच, तेव्हा आपण बोलत होता, आज आपण शांत आहात आणि देशाला अजूनही उत्तर नाही.
