तितिक्षा ग्रुपच्यावतीने डॉ.विठ्ठल जाधव आणि सौ.विद्या जाधव यांना कोहिनुर दाम्पत्य पुरस्कार

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी विठ्ठल जाधव व त्यांच्या पत्नी सौ. विद्याताई जाधव यांना पुणे येथील तितिक्षा समुहाने समाज कोहिनुर दांम्पत्य पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला. हा पुरस्कार महामंडळेश्र्वर कृष्णदेवगिरीजी महाराज यांनी जाधव दाम्पत्याला प्रदान केला.
राज्यात सामाजिक कार्यात अग्रसेर असलेल्या तितिक्षा परिवाराने शांतीदुत परिवाराच्या अध्यक्षा सौ.विद्याताई जाधव आणि त्यांचे पती सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.विठ्ठल जाधव यांना हा पुरस्कार 7 डिसेंबर रोजी सुर्यदत्ता गु्रप ऑफ इन्स्टीटुटच्या सभागृहात प्रदान केला. तितिक्षा इंटरनॅशनल पुणे या संस्थेच्या दशकपुर्तीनिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी पद्मश्री गिरीश प्रभुने, पद्मश्री उदय देशपांडे व महामंडळेश्र्वर कृष्णदेवगिरीजी महाराज हे प्रमुख पाहुने होते. या प्रसंगी तितिक्षा अग्रेसर हा पुरस्कार शांतीदुत अभिनेते सिध्देश्र्वर झाडबुके, डॉ.मधुसुदन घाणेकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.प्रिती काळे, सौ.सुवर्णाताई जाधव, अभिनेत्री पुणे शांतीदुत महिला विभाग अध्यक्षा रोहिणी कोळेकर, विजय टुबे, राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी शांतीदुत प्रतिष्ठाण मधुकर चौधरी, शांतीदुत परिवार अध्यक्ष शिवाजीनगर महादेव जावध, नरे अध्यक्ष अकबर मेनेन, पोलीस मित्र सदानंद बेलसरे यांच्यासह शिवराम मदने, नितीन दुधाटे हे प्रमुख उपस्थित होते.
शांतीदुत परिवाराच्यावतीने केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. भविष्यात शांतीदुत परिवार संस्था राष्ट्रभक्ती, शांतता, धार्मिक सलोखा, मानव सेवा, निसर्ग सेवा आदी कार्य अधिक प्रभावीपणे करेल अशी ग्वाही देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!