महापरिनिर्वाण दिनी महामानवास अभिवादन

नांदेड (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करण्यास आंबेडकर अनुयायांची पुतळा परिसरात 6 डिसेंबर रोजी सायंकाळपर्यत रिघ लागली होती. रेल्वे स्थानक येथील पुर्णाकृती पुतळ्यास नतमस्मक होऊन हजारो अनुयायी, खासदार, आमदार, जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांचीही अभिवादन केले.
संविधन निमति भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. 6 डिसेंबर 1956 रोजी जगाचा निरोप घेतला. तेव्हापासून महापरिनिर्वाण दिन म्हणून बाबासाहेबांना सर्वत्र अभिवादन केले जाते. 69 व्या महापरिनिर्वाण दिनी नांदेड शहरातील रेल्वेस्थानक परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास भल्या पहाटे बुद्ध वंदनेने अभिवादन करण्यात आले. यानंतर दिवसभरात हजारो लहान, थोरांनी आंबेडकर अनुयायांनी पुतळ्यास नतमस्तक होऊन अभिवादन केले. तर आंबेडकर अनुयायांसोबत खासदार, शिवसेनेचे आ. बालाजी कल्याणकर, जिल्हा प्रमुख गंगाधर बडुरे, मंगेश कदम, उमेश मुंडे यांच्यासह जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी राहूल कर्डीले, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सहायक आयुक्त मिर्झा बेग, अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे यांनीही अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सायंकाळपर्यंत अभिवादन करण्यासाठी रिघ सुरूच होती.
दरम्यान महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे शहरात पणतीज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी वाजता जयभीम नगर येथून ही रॅली निघून म.फुले पुतळा आयटीआय, शिवाजीनगर-कलामंदिर मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे जाणार आहे.

काळ्या दिवसानिमित्त मुस्लीम बांधवांचे प्रतिष्ठाने बंद


बाबरी मस्जिद पाडल्यानंतर मुस्लिम बांधव दरवर्षी 6 डिसेंबर रोजी काळा दिवस साजरा करतात आणि आप-आपले प्रतिष्ठाण बंद ठेवून निषेध व्यक्त करतात.

 

शौर्य दिनानिमित्त महाआरती

हिंदु समाजाच्यावतीने 6 डिसेंबर रोजी बाबरी मस्जिद पाडली गेली होती. त्यानिमित्ताने शौर्य दिन साजरा केला जातो. आज त्या निमित्ताने शहरातील महाविर चौकात असलेल्या पंचवटी हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. त्यावेळी शेकडोच्या संख्येने लोक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!