नांदेड(प्रतिनिधी)-वेगवेगळ्या व्हाटसऍप नंबरवरून कॉल करून NWMALPHA या ऍपमध्ये गुंतवणूक करायला लावून दोन जणांनी नांदेडच्या एका व्यक्तीची फसवणूक केली असून त्यांचे 13 लाख 88 हजार 300 रुपये गायब केले आहेत.
नांदेड येथील श्रध्दानगर येथे राहणारे रत्नदीप शामराव ढोणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 सप्टेंबर रोजीपासून ते 9 ऑक्टोबर दरम्यान अन्यन्या शर्मा व शिवा सहेगल या दोघांनी वेगवेगळ्या व्हाटसऍपनंबरवरून कॉल करून त्यांना. NWMALPHA या ऍपमध्ये 13 लाख 88 हजार 300 रुपयांची गुंतवणूक करायला लावली. कोणताही अधिकचा फायदा न देता मुळ रकमेचाच अपहार करून आर्थिक फसवणूक केली आहे. सायबर पोलीस ठाणे नांदेड येथे हा गुन्हा क्रमांक 8/2025 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक वसंत सप्रे करणार आहेत.
13 लाख 88 हजारांची ऑनलाईन फसवणूक
