नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर नाका येथील एक पान शॉपचा पत्रा तोडून त्यातून 84 हजार 882 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला आहे.
अहेमद बिन अब्दुला चाऊस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 नोव्हेंबरच्या सकाळी 10 ते 16 नोव्हेंबरच्या सकाळी 8 वाजेदरम्यान देगलूर नाका येथील त्यांच्या मालकीच्या तारा पान शॉपचा पत्रा खोलून त्यात असलेल्या लॉकरमधील 38 हजार 300 रुपये रोख रक्कम आणि 46 हजार 522 रुपयांचा सिगरेट पॉकीट असा एकूण 84 हजार 822 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरला आहे. इतवारा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 351/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार पठाण अधिक तपास करीत आहेत.
पान शॉप फोडून 84 हजार 800 रुपयांची चोरी
