नांदेड(प्रतिनिधी)- लोहा येथील एका मंगल कार्यालयातून एका महिलेच्या बॅगमधील 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी चोरून नेण्यात आली आहे. हुनगुंदा ता.बिलोली येथे शासनाने साठवून ठेवलेली 80 ब्रास वाळू चोरीला गेली आहे.
सुनिता महेश घुगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.16 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्यासुमारास विकी मंगल कार्यालयात त्या समारोहात हजर असतांना त्यांच्या पिशवीमधील 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी कोणी तरी चोरट्यांनी चोरली आहे. लोहा पोलीसांनी हे प्रकरण गुन्हा क्रमांक 351/2025 प्रमाणे दाखल केले असून पोलीस अंमलदार तिडके अधिक तपास करीत आहेत.
कुंडलवाडी येथील तलाठी शिवलिंग गोविंद वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान मौजे हुनगुंदा ता.बिलोली येथे शासनाने 350 ब्रास लाल वाळू साठवून ठेवली होती. त्यातील 80 ब्रास वाळू किंमत 48 हजार रुपयांची कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. कुंडलवाडी पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 175/2025 नुसार नोंदवली असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक शेख अधिक तपास करीत आहेत.
लोहा येथे मंगल कार्यालयातून सोन्याची अंगठी चोरली; शासनाने साठवून ठेवलेल्या लाल वाळूमधून 80 ब्रास वाळू चोरीला गेली
