49 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायतीसाठी निवडणुक निरिक्षकांच्या नियुक्त्या

नांदेड(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आठ जिल्ह्यांमध्ये होणाऱ्या नगर परिषदा आणि नगर पंचायत सार्वत्रिक निडणुक 2025 साठी निवडणुक निरिक्षकांची नेमणूक केली आहे.
या नियुक्ती आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील देगलूर नगर परिषदेसाठी हिंगोलीचे अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांना नियुक्त करण्यात आले आहे. मुदखेड, भोकर आणि उमरी नगर परिषदेसाठी लातूरचे पुर्नवसन जिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी यांना पाठविण्यात आले आहे. बिलोलीी धर्माबाद आणि कुलंकडवाडीसाठी बीड येथील भुसंपादन उपजिल्हाधिकारी सतिश धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हदगाव नगर परिषद आणि हिमायतनगर नगर पंचायतीसाठी हिंगोली येथील उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांना पाठविण्यात आले आहे. कंधार, लोहा, मुखेड या नगर परिषदांसाठी परभणी येथील उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यातील अहमदपुर आणि उदगीरसाठी धाराशिव येथील अपर जिल्हाधिकारी ज्योती हनुमान पाटील, औसा, रेणापुर आणि निलंगा नगर परिषदेसाठी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी अजय शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील आंबड, परतुर या नगर परिषदा निवडणुकांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील उपजिल्हाधिकारी विजय साहेबराव राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोकरदन नगर परिषदेसाठी परभणीचे अपर जिल्हाधिकारी श्रावण श्रीरंग क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसतमतनगर अणि हिंगोलीसाठी नांदेडचे अपर जिल्हाधिकारी रत्नदिप रामचंद्र गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे. कळमनुरीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यांची नि युक्ती झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आणि वैजापूर या नगर परिषदांसाठी अंबेजोगाई जि.बीड येथील अपर जिल्हाधिकारी अश्र्विनी हरीषचंद्र सोनवणे-जिरंगे यांनपा नियुक्त करण्यात आले आहे. गंगापुर, खुलताबाद नगर परिषद आणि फुलंब्री नगर पंचायतीसाठी बीड येथीली उपजिल्हाधिकारी शैलंद्र सुर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कन्नड आणि शिल्लोड नगर परिषदांसाठी बीड येथील अपर जिल्हाधिकारी हरीष कृष्णराव धार्मिक यांचीनियुक्ती करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई आणि बीड नगर परिषदांसाठी जालना येथील अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांना पाठविण्यात आले आहे. गेवराई आणि किल्लेधारुर या नगरपरिषदांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण बाबुराव फुलारी यांची नियुक्ती झाली आहे. माजलगाव आणि परळी परगर परिषदांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील अपरर जिल्हाधिकारी संभाजी इरवंतराव आडकुणे यांची नियुक्ती झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील भुम आणि धाराशीव नगर परिषदांसाठी लातूरच्या अपर जिल्हाधिकारी शिल्पा नरसींह करमरकर यांची नियुक्ती झाली आहे. कळम आणि मुरूम या नगर परिषदांसाठी बीड येथील उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांची नियुक्ती झाली आहे. नळदुर्ग आणि परांडा नगर परिषदांसाठी लातूर येथील उपजिल्हाधिकारी संगिता टकले यांना पाठविले आहे. तुळजापूर आणि उमरगा नगर परिषदांसाठी लातूरच्या उपजिल्हाधिकारी आाहिल्या गाठाळ यांना नियुक्ती दिली आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि जिंतूर नगर परिषदांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील अपर आयुक्त प्रताप काळे यांना पाठविण्यात आले आहे. पाथरी आणि सेलू नगर परिषदासाठी छत्रपती संभाजीनगर येथील अपर आयुक्त मंजुषा मिसकर यांना नियुक्ती दिली आहे. पुर्णा, सोनपेठ आणि मानवत नगर परिषदांसाठी जालीना येथील जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!