भोकर तालुक्यात 2 लाख 81 हजारांच्या दोन चोऱ्या

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे सावरगाव मेट ता.भोकर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 61 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. भोकर तालुक्यात दुसरी चोरी मौजे राखोड येथे झाली असून तेथे 2 लाख 19 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
संदीप शंकरराव बंदगुलवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 नोव्हेंबरच्या दुपारी 2 ते 4 या वेळेदरम्यान मौजे सावरगाव मेट येथील त्यांच्या घराला लावलेले कुलूप गजाळीने तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा 61 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भोकर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 521/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार कळने अधिक तपास करीत आहेत.
रायखोड ता.भोकर येथे राहणारे अंकुश पांडूरंग गोरलेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान या कालाखंडात मंगलसाईनाथ चिंतमवाड आणि इतर दोघांनी मिळून त्यांच्या घरातील 2 लाख 19 हजार 800 रुपयंाचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. भोकर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 520/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक सुरेश जाधव अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!