“आर्टी” च्या वतीने उद्या नांदेडमध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन

नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर्टीच्या वतीने नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रविवार १२ ऑक्टोबर रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संमेलनाचे स्वागत अध्यक्ष मारुती वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार असून संमेलनाध्यक्षपदी परभणी येथील विठ्ठला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लोणी बु. चे प्राचार्य डॉ. दशरथ इबतवार यांची निवड करण्यात आली आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण हे राहणार आहेत तर विशेष मार्गदर्शक म्हणून ना. गिरीश महाजन, ना. संजय शिरसाट, ना. माधुरीताई मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

साहित्य संमेलनात महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना डि.लिट ही पदवी दिल्याबद्दल विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम आणि महात्मा गांधी मिशन या संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांचाही गौरव करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनास विशेष अतिथी म्हणून खा. डॉ. अजित गोपछडे, खा. प्रा. रवींद्र चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे बीज भाषण क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ “लसाकम”चे प्रदेशाध्यक्ष प्रा. संजय गायकवाड करणार आहेत.

तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार भीमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार बाबुराव कदम, आमदार आनंद तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार संजय केनेकर यांच्यासह माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताई पाटील, कुसुमताई बाबासाहेब गोपले, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार अमर राजूरकर, माजी आ. अविनाश घाटे, माजी आ. श्यामसुंदर शिंदे, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. हनुमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आ. गंगाधर पटणे, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माजी आ. पृथ्वीराज साठे, राम गुंडले, रामचंद्र नावंदीकर, सुधाकर भालेराव, सुभाष साबणे, अनुसयाताई खेडकर हे उपस्थित असणारा असून विशेष अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमप, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त महेश डोईफोडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांची उपस्थिती असणार आहे.

रविवार १२ ऑक्टोबर रोजी  सकाळी 8 वा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून ग्रंथदिंडी निघणार अजून या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार आहे. समारोप समारंभाचे विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंत्री शंभूराज देसाई यांची उपस्थिती असणार आहे.

समारोप समारंभाच्या कार्यक्रमात इयत्ता दहावी, बारावी ८५ टक्के गुण घेतलेल्या, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी निवड, नेट, सेट,पीएच.डी. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी विजय रणखांब, संजय मोरे, प्रा. देविदास इंगळे, किरण गोइनवाड, माधव गोरकवाड, अंबादास भंडारे यांच्याकडे नावे नोंदणी करावी.

समारोपानंतर पुणे येथील धनंजय खुडे आणि संच यांच्यावतीने गाथा लोकशाहीरांची हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन नांदेडचे स्वागतध्यक्ष मारोती  वाडेकर,निमंत्रक गणेश अण्णा तादलापूरकर, गंगाधर  कावडे, गुणवंत काळे, कार्यवाह यशपाल गवाले, महाव्यवस्थापक नामदेव कांबळे प्रेमानंद शिंदे, प्रितम गवाले, शिवा  कांबळे, विजय रणखांब, प्रा. देविदास इंगळे, निलेश तादलापूरकर, संतोष शिंदे  यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!