नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन युवकांना पकडून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्टल जप्त केल्या आहेत. इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक बाबुराव चव्हाण, पोलीस अंमलदार अर्जुन मुंडे, शंकर माळगे, गवेंद्र सिरमलवार, नितीन गंगलवाड, समिर आणि शिरगिरे यांनी 25 सप्टेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार अरफाद कॉलनी वसरणी येथे सय्यद शाहीन सय्यद दस्तगिर(21) रा.रहिमपुर वसरणी, बलबिरसिंघ प्रतापसिंघ जाधव(22) रा.वजिराबाद नांदेड, शेख आदील शेख शकील हा फरार आहे. त्यापैकी दोघांना पकडले आणि त्यांच्याकडून 60 हजार रुपये किंमतीचे दोन गावठी पिस्टल जप्त केले. हे दोन गावठी पिस्टल फरार असलेल्या शेख आदील शेख शकीलने विक्री करण्यासाठी दिले होते. Kanthak Suryatal Post Views: 2,084 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गुन्हा आणि पोलीस कामाचे पोस्टमार्टम झाले;निकिता शाहपूरवाडला जामीन ऍड.मनप्रितसिंघ ग्रंथी यांना पितृशोक