नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेत गुंठेवारी विभागात कार्यरत कंत्राटी स्थापत्य उपअभियंत्याला न्यायालयाने सध्या तुरूंगात पाठवून दिले आहे.
15 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 28 हजाराची लाच घेणार्या महानगरपालिकेतील गुंठेवारी विभागात कार्यरत पण कंत्राटी पध्दतीवर असलेल्या विजय शेषराव दवणे यास पकडले. न्यायालयाने दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आता त्यास तुरुंगाच्या वास्तव्यास पाठवून दिले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार उपअभियंता दवणेला जामीन मिळावा यासाठी अर्जच आलेला नाही.
संबंधित बातमी…
