संपुर्ण भारत देशात पाकिस्तान सोबत क्रिकेटचा सामना खेळायचा नाही ही भावना फक्त मोठ्याच व्यक्तींची होती असे नाही तर लहान-लहान बालक-बालिकांची सुध्दा अवस्था हीच होती आणि त्यांना सुध्दा वाटत होते की, पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळायचा नाही. तरी पण क्रिकेट सामना झालाच. सुदैवाने त्यात भारताने विजय मिळवला. विजयानंतर मात्र नवनवीन गोष्टी पेरून आम्ही किती भारी केले असे दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. परंतू या प्रयत्नात असे करणाऱ्यांचे स्वत: हास्य होत आहे हे त्यांनाच कळत नाही. पत्रकार एखाद्या घटनेचे विश्लेषण करतांना अनेक घटनांना जोडून त्याची साखळी तयार करतात आणि ती साखळी विश्लेषण बनवली जाते. म्हणूनच म्हणतात “लेखणी के हस्ताक्षर नही होते.’ असे विश्लेषण करतांना पब्लिक इंडियाचे प्रा.अखिल स्वामी यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर भारत देशाविरुध्द तयार झालेला दबाव सहन होत नव्हता. म्हणूनच हा क्रिकेट सामना खेळल्यानंतर सुध्दा आपल्याला नुकसान होणार आहे हे माहित असून सुध्दा केंद्र सरकारने क्रिकेट सामन्याला परवानगी दिली. सोबचत गोदी मिडीयाला सुपारी देवून टाकली की, माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड, सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर यांच्यावर नारळ फोडले जात आहे. यामुळे सुध्दा हस्य होत आहे. कारण पंडीत जवाहरलाल नेहरुंच्याच चुकीमुळे बांग्लादेशात जनसंर्घाचाउठाव झाला असेच बोलण्यासारखे हे प्रकरण सुध्दा आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पुर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी यांनी पाकिस्तानला भेटी दिल्या. पाकिस्तानच्या शासकांना आपल्या येथे बोलावले. पण पाकिस्तानने कधीच दगा करण्याचे सोडले नाही. त्यांच्या भेटींमुळे काही फरक पडला नाही. अटल बिहारीजी वाजपेयी यांनी सुरू केलेली समझोता रेल्वे सुध्दा बंद झाली. त्यांनी एक बस मार्गपण सुरू केला होता. ही बस दिल्ली येथून कराची येथे जात होती. ती सुध्दा बंद झाली. अनेक वेळेस पाकिस्तानने त्यांच्या काळात सुध्दा धोका दिला. पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंघ असतांनाच क्रिकेट खेळणे बंद करण्यात आले होते. सध्याच्या परिस्थितीत ऑपरेशन सिंदुरनंतर भारत देशाच्या नागरीकांमध्ये पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळायचाच नाही ही भावना होती. एवढेच नव्हे तर काही गोदी मिडीया सुध्दा क्रिकेट सामना न खेळण्याबद्दल चर्चा घडवित होते. त्यांचे समर्थन करतांना भारतीय जनता पार्टीचे विद्वान खा. अनुराग ठाकूर हे म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळविण्याचा अधिकार हा आयसीसीचा असतो. मग आयसीसीचे अध्यक्ष कोण आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपूत्र जय शाह मग त्यांना का निर्णय घेता आला नाही. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुध्दा सर्व भारतीय जनता पार्टीचीच लोक आहेत. एक मंत्री साहेब कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थींनीच्या कार्यक्रमात एका विद्यार्थीनीला उत्तर देतांना सांगत होते की, आम्ही पाकिस्तानसोबत पाण्याचे बोललो होतो. क्रिकेटचे नाही. तेंव्हा तेथे बसलेले युवक-युवती ज्या पध्दतीने हसले होते. त्या मंत्री महोदयांना तो आपला अपमान असल्याचे कळले नाही अशी आहे राजकीय परिस्थिती.
क्रिकेट सामना झाला त्यात भारताचा विजय झाला. पण आता आम्ही त्यांचे पाणी बंद केले आहे. हा सुध्दा भंपक शब्द आहे. कारण भारताने पाकिस्तानचे पाणी बंद केले तर बहुतेक उत्तर भारत पाण्याखाली येईल. त्यात ते पाणी कोठे वळविता येणार आहे. पाकिस्तानकडे सोडल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. फक्त राजकीय फायदा उचलण्यासाठी बोलतात. आमच्या कॅपटन ने त्यांच्या कॅपटनसोबत हस्तांदोलन केले नाही. विजयानंतर सुध्दा पाकिस्तानी खेळाडून हस्तांदोलनासाठी लाईनमध्ये उभे असतांना त्यांच्याशी हस्तांदोलन केले नाही. जय शाह हा क्रिकेट सामना पाहायला गेले नाहीत वाचकांनो या शब्दांनी ऑपरेशन सिंदूर पुर्ण झाले काय ? याचा अर्थ असाच होतो की, तुम्ही मैत्रीपुर्ण संबंध दाखविण्यासाठीच हा सामना खेळण्याची परवानगी दिली. माजी क्रिकेटपटू लिटल मास्टर सुनिल गावस्कर सांगतात. केंद्रीय सरकारच्या परवानगीनेच क्रिकेट सामने होतात आणि हा सुध्दा सामना त्यांच्याच परवानगीने झाला आहे.
वाचकांना प्रश्न पडला असेल ही पार्श्र्वभूमी मांडण्यामध्ये काय अर्थ निघतो. आम्हाला वाचकांसमोर मांडायचे आहे की, एवढा विरोध असतांना सोबतच क्रिकेट सामना खेळल्यानंतर आपल्याला नुकसान होणार आहे हे माहित असतांना क्रिकेट सामना का झाला. कारण भारताने पहलगाम हल्यात खुप मोठी चुक केली आहे. 2008 मधील अतिरेकी हल्यांच्या संदर्भाने कॉंगे्रसवर डोजिअर डोजिअर खेळण्याचा विनोद करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने सुध्दा डोजिअर डोजिअरच खेळायला हवे होते कारण त्यामुळे घटनेचा तपास पुर्ण झाला असता. पुरावे जमा झाले असते आणि ते पुरावे जगासमोर मांडता आले असते. कारण ऑपरेशन सिंदुरच्या वेळेस जगातील कोणताही देश भारतासोबत उभा नव्हता. उलट पाकिस्तानसोबत चिन, तुर्कस्थान, उत्तर कोरिया हे देश उभे राहिले. आम्ही डोजिअर तयार केले असते तर जग आमच्यासोबत उभे राहिले असते. पहलगाम तर सोडाच आजही पुलवामा हल्याचा तपास सुध्दा पुर्ण झालेला नाही. त्यानंतर शहिदांच्या नावाने मतदान मागण्यात आले होते. भारताच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस.सी.ओच्या बैठकीत चिनमध्ये सहभाग घेतला तेंव्हा पहलगाम हल्याचा निषेध केला. मात्र पाकिस्तानचे नाव घेतले नाही. त्या नावाचा उपयोग भारताच्या निवडणुक सभांमध्ये केला जातो. आणि मतदान मिळवले जाते. आजच्या परिस्थितीत अमेरिका हे भारताला दाखवत आहे की, मागील 11 वर्षामध्ये तुमची परिस्थिती बिघडली आहे आणि म्हणून तुम्ही चिनसोबत भिडू शकत नाही आणि आमच्या काही कामाचे नाही.
अमेरिकेच्या टेरिफ निर्णयाने भारताच्या शेतकऱ्यांवर मोठा परिणाम होणार आहे. समुद्र खाद्य व्यवसायीकांवर मोठा परिणाम होणार आहे. मका उत्पादकांवर मोठा परिणाम होणार आहे. भारताने अयात होणाऱ्या कापसावर असलेला 10 टक्के आयातकर रद्द केलेला आहे. म्हणजे अमेरिकेचा कापुस भारतात येईल. आणि भारताचा दोन महिन्यानंतर तयार होणारा कापुस विकला जाणार नाही. मग काय परिस्थिती होईल शेतकऱ्यांची सोबतच अमेरिकेत मका उत्पादक मोठ्या प्रमाणात होते. आता मक्का सुध्दा आमचा घ्या असे काम सुरू आहे. जर मक्का सुध्दा भारतात येवू लागला तर भारतातील मक्का उत्पादक काय करतील. या सर्व प्रकरणानंतर आता गोदी मिडीयाला राहुल द्रविड, सौरभ गांगुली, सचिन तेंडूलकर यांच्यावर करळ ओकण्याची सुपारी दिली आणि ते सुरू आहे. 1980 मध्ये रशियावर हल्ला झाला होता तेंव्हा रशियाने ऑलम्पिक स्पर्धेतच भाग घेतला नाही. मग आम्ही एक सामना सोडू शकलो नाही. त्याची आर्थिक कारणे सुध्दा आहेत. परंतू प्रा.अखिल स्वामी यांच्या मते आता राष्ट्रवादी हा शब्द वापरून आणि पाकिस्तानला शिवी देवून मतदान मिळविता येणार नाही. परंतू जागतिक दबावामुळे हा क्रिकेट सामना खेळण्यासाठी केंद्र सरकारने परवागनी दिली आहे.
जागतिक दबावामुळेच भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना झाला
