नांदेड, : –शिक्षक दिनानिमित्य 5 सप्टेंबर रोजी समाज कल्याण कार्यालयात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत मुलामुलींच्या शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचा शाल पुष्पगुच्छ देवुन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे तर प्रमुख पाहुणे म्हणुन सगरोळी येथील विज्ञान विषयाचे शिक्षक पी. के कदम हे होते. शिक्षक हा समाजाच्या निर्मितीमधील एक महत्वाचा घटक असून, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मत पी.के.कदम यांनी व्यक्त केले. तर समारोप शिवानंद मिनगिरे यांनी केले.
या कार्यक्रमात मुख्याध्यापक अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा उमरी येथील संजयकुमार मोरे, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा नायगांवचे मुख्याध्यापक नवाज शेख, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा माहूरचे मुख्याध्यापक सचिन जोशी व मुलांची शासकीय निवासी शाळा उमरीचे सहशिक्षक सचिन पाटील यांचा शिक्षक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण निरीक्षक पंडित खानसोळे यांनी तर सूत्रसंचालन व आभार गजानन पापंटवार यांनी केले.
