नांदेड –येथील कु. तेजस्विनी भद्रे ह्या विद्यार्थिनीने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या UGC तर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील NET आणि राज्यस्तरावरील SET ह्या दोन्ही परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण केल्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नांदेड येथील डॉ. वंदना आणि डॉ. विलासराज भद्रे ह्यांची ती सुकन्या असून राहुरी कृषी विद्यापीठातून कृषी अर्थशास्त्र ह्या विषयात M.Sc.विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली असून सध्या ती कृषी अर्थशास्त्रात Ph.D. करीत आहे. दहावीपासून पदव्युत्तर परिक्षेपर्यंत आणि विविध स्पर्धा परीक्षेत तिने घवघवीत यश मिळविले आहे. ती उत्तम वक्ता, निवेदिका असून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातही कार्यरत आहे.
ती आंबेडकरवादी मिशन, नांदेड येथील विद्यार्थिनी असून आपल्या यशाचे श्रेय तिने आई,वडील, आंबेडकरवादी मिशन प्रमुख दीपक कदम सर आणि सर्व शिक्षकांना दिले आहे.
