पुणे,(प्रतिनिधी)- डोणजे येथील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण देणारी अविरत करिअर अँकँडमीचा आज प्रथम वर्धापन दिन आमंत्रित मान्यवर, निमंत्रित प्रमुख पाहुणे अतिथींच्या उपस्थित साजरा करण्यात आला.
प्रथमत: मान्यवरांच्या हस्ते छत्रपती राजे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तद्नंतर दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत पुणे ग्रामीणचे डि.वाय.एस.पी सुनिल कुमार पुजारी होते. सोबत ए.एस.आय कुंभार , पोलीस काॅन्स्टेबल विक्की खोमणे सहकारी गणेश चोरमोले यासह मार्गदर्शक टिम इशराक शेख, रूपेश गोनाळ ,जाधव , पाटील आणि नांदेडकर सर विचारमंचावर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे मनोगत झाले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यश अपयशसोबत जिद्द मेहनत दैनंदिन सरावाचे महत्त्व सांगितले. माजी सैनिक चव्हाण सरांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचलन अफरिन शेख तर आभार मयुर सरोदे यांनी मानले. यावेळी पालक प्रतिनिधी शशिकांत अहिवळे विद्यार्थ्यी प्रतिनिधी ओमकार गायकवाड, गणेश कुटेकर, ऋतुराज जेधे विद्यार्थींनी प्रतिनिधी आर्या पारगेसह पालक विद्यार्थी विद्यार्थ्यीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
