नांदेड(प्रतिनिधी)-तरोडा येथील लक्ष्मीमाता मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यातील 1 लाख 35 हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. गोकुंदा, किनवट येथील एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 41 हजार 606 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. लोहा येथे बॅंकेतून काढलेले 1 लाख 61 हजार रुपये कोणी तरी चोरट्यांनी चोरले आहेत.
भगवान सिध्देश्र्वर स्वामी हे देशमुखनगर तरोडा (बु) येथील लक्ष्मीमाता मंदिराचे पुजारी आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 ऑगस्टच्या रात्री 2 ते 3 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिणे 1 लाख 20 हजार 600 रुपये किंमतीचे आणि रोख रक्कम 15 हजार रुपये असा एकूण 1 लाख 35 हजार 600 रुपयंाचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 467/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक देशमुख हे करीत आहेत.
एकविरानगर, गोकुंदा ता.किनवट येथील सय्यद सैफोद्दीन सरफौद्दीन यांनी दिलैल्या तक्रारीनुसार 21 ऑगस्ट रोजी ते आणि त्यांचे कुटूंबिय आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असतांना कोणी तरी चोरट्यांनी त् यांचे घरफोडून 3 लाख 41 हजार 606 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे चोरून नेले आहेत. किनवट पोलीसांनी गुन्हा क्रमांक 259/2025 दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक फडेवार अधिक तपास करीत आहेत.
लोहा येथील माधव नामदेव मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दुपारी 4.30 वाजता आपल्या बॅंकेतून 1 लाख 61 हजार रुपये काढले. ते पैसे त्यांनी आपल्या ऍटोच्या डिक्कीमध्ये ठेवले परंतू मयुरी ऍटो मोबाईलसमोर ऍटो उभा केला असतांना कोणी तरी चोरट्यांनी ते 1 लाख 61 हजार रुपये चोरले आहेत. लोहा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 263/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक पांचाळ अधिक तपास करीत आहेत.
तरोडा महालक्ष्मी मंदिरात चोरी; गोकुंदात घरफोडले; लोहा येथे ऍटोच्या डिक्कीतून 1 लाख 61 हजार रुपये चोरले
