नांदेड(प्रतिनिधी)-राज्य शासनाच्या गृहविभागाने पाच पोलीस उपअधिक्षकांना त्यांच्या सध्याच्या नियुक्तीच्या ठिकाणी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचे आदेश निर्गमित केेले आहेत.
राज्य शासनाच्या गृहविभागाचे सचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशानुसार पोलीस उपअधिक्षक मिलिंद देवराम शिंदे-उपविभागीय पोलीस अधिकारी शहापुर उपविभाग, ठाणे ग्रामीण, प्रणिल प्रफुल्ल गिल्डा-उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज उपविभाग जिल्हा सांगली, विशाल शामराव हिरे-सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मंदार मल्लीकार्जुन जावळे-सहाय्यक पोलीस आयुक्त ठाणे शहर, भास्कर नाना पुकले-सहाय्यक पोलीस आयुक्त मिरा-भाईंदर-वसई -विरार या पाच जणांना त्यांच्या सध्याच्या पदस्थापने एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.
पाच पोलीस उपअधिक्षकांना एका वर्षाची मुदतवाढ
