नांदेड –ज्येष्ठ लेखक, कवी नारायण शिंदे यांचा यांच्या लुटीचा ताळेबंद या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिनांक 10 ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजता गणराज फंक्शन हॉल नमस्कार चौक नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे.
आ. सतीश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य अकादमी प्राप्त बालकवी डॉ. सुरेश सावंत यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी कवितेचे अभिवाचन प्रसिद्ध कवी आत्माराम राजेगोरे हे करणार आहेत तर प्रकाशन सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या शिक्षण उपसंचालक राजेश शिंदे , ह भ प भास्करबुवा शिंदे , विजयकुमार चित्तरवाड , दिलीप धर्माधिकारी आणि दिगंबर कदम यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. निर्मल प्रकाशनाने प्रकाशनसाठी सिद्ध केलेल्या या प्रकाशन सोहळ्यास साहित्य प्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी आणि यशवंतराव चव्हाण विचार मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
