राणी सावरगाव येथे संगीतमय गुरुपौर्णिमा साजरी

नांदेड –  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणी सावरगाव येथील संगीत विभाग व गजानन संगीत विद्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने  आषाढ महोत्सव व गुरु पौर्णिमा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात जवळपास 86 विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे गीत गायन केले.

विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी विशेषतः या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. भारतीय संगीताची कला समाजात जागृत ठेवणे , शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार करणे , संगीतासारखी कला समाजात रुजली पाहिजे असा या कार्यक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणीसावरगाव येथील कायदेशीर सल्लागार ॲड. शिवाजी हाके ( ज्येष्ठ विधी तज्ञ ,नांदेड ) , प्रा. राम जाधव, त्रिधारा संस्थान चे मठाधिपती खंडुगुरु आसोळेकर, गुरुवर्य प्रभाकर अपस्तंभ, गुरुवर्य सीता भाभी , आ. रत्नाकर अपस्तंभ, प्रो. धनंजय जोशी  ( महात्मा गांधी इंजिनिअरिंग कॉलेज नांदेड ) , डॉ.संतोष हंकारे हे उपस्थित होते. तर राणीसावरगाव संस्थेचे सचिव सचिव कृष्णा भैया दळणर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बोनर  यांनी ऑनलाईन च्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या नांदेड मधील गायनक्षेत्रातील बरीच मंडळी उपस्थित होती. हा कार्यक्रम गिरीराज मंगल कार्यालय नांदेड येथे घेण्यात आला.या कार्यक्रमाचे संचालन सौ. अंबालिका शेटे यांनी केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व आयोजन संगीत विभागाच्या डॉ. दिपाली पांडे, गजानन संगीत विभागाच्या संचालिका सौ. सारिका पांडे व चेतन पांडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!