नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 6 ऑगस्ट रोजी घरातून रागाच्या भरात निघून गेलेली अल्पवयीन बालिका 9 तासात शोधून पुन्हा आई-वडीलांच्या स्वाधीन केली आहे.
दि.6 ऑगस्ट रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेच्या पित्याने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी 6 ऑगस्ट रोजी अभ्यासाच्या कारणावरुन रागावल्याने सायंकाळी 6 वाजता घरातून निघून गेली. नांदेड ग्रामीण पोलीसांनी तांत्रिक सहाय्याने या बालिकेचे लोकेशन जालना येथे असल्याचा शोध लावला आणि जालना पोलीसांच्या मदतीने तिला ताब्यात घेतले. त्यानंतर नांदेड पोलीसांनी या बालिकेला जालना येथून नांदेडला आणले आणि सुखरुपपणे आई-वडीलांच्या स्वाधीन केले आहे. ही कामगिरी नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक बाळासाहेब रोकडे, पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्र्वर मठवाड, पोलीस अंमलदार वसंत केंद्रे, संतोष पवार, विष्णु कल्याणकर आणि मारोती पचलिंगे यांनी पुर्ण केली.
घरातून रागाने निघून गेलेली अल्पवयीन बालिका नांदेड ग्रामीण पोलीसांनी 9 तासात शोधली
