नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर जवळील पार्डी टोलनाक्याजवळ एका ट्रकमध्ये दाटीवाटीने बांधून वाहतुक होणारे 30 रेडे अर्धापूर पोलीसांनी पकडले आहेत. रेडे आणि गाडी यांची किंमत 35 लाख 9 हजार रुपये आहे.
पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर भाऊराव सुर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 11.30 वाजेच्यासुमारास पार्डी टोलनाक्यासमोरील पुलावर आर.जे. 14 जी.के.8065 ही ट्रक तपासणी केली असता त्यात अत्यंत दाटीवाटीने, कु्ररतेने, निर्दयीपणे 30 रेडे बांधलेले होते. या रेड्यांची किंमत 5 लाख 9 हजार रुपये आणि 30 लाख रुपयांची गाडी असा 35 लाख 9 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणात आरोपी या सदरात नसीम एकबाल खान (24), हरीष बाबु कुरेशी (45), हरुन कलवा कुरेशी(47), अजरोद्दीन नसरोद्दीन खान (28) सर्व रा.हरीयाना उत्तरप्रदेश यांची नावे आहेत. अर्धापूर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 450/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार नरवाडे अधिक तपास करीत आहेत.
अर्धापूर पोलीसांनी 30 रेडे पकडले
