नांदेड(प्रतिनिधी)-कांचननगर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 85 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
कांचनगर येथील संतोष तातेराव दुधमल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.31 जुलैच्या रात्री 11.30 ते 1 ऑगस्टच्या पहाटे 7 वाजेदरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी लोखंडी पेटीमध्ये ठेवलेले 45 हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे आणि 1 लाख 40 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 1 लाख 85 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 442/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे अधिक तपास करीत आहेत.
