नांदेड(प्रतिनिधी)-उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 4 जुलै रोजी परभणी पोलीसांना सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात आठ दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच या प्रकरणाची सुनावणी आज 30 जुलै रोजी होणार होती. परंतू परभणी पोलीसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा तर दाखल केलाच नाही. उलट सर्वोच्च न्यायालयात अपील केले. परंतू सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल बरोबर असल्याचे सांगत पोलीसांचे अपील फेटाळले आहे.
दि.4 जुलै रोजी न्यायमुर्ती विभा कंकनवाडी आणि न्यायमुर्ती संजय देशमुख यांनी भारतीय संविधानातील परिछेद 226 प्रमाणे न्यायीक चौकशी झाल्यानंतर काय करावे या संदर्भाने काही कायदा नाही आणि त्या संदर्भाने सुचना द्याव्यात अशी विनंती ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. त्यानुसार आठ दिवसात सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सुर्यवंशी यांच्या 18 डिसेंबरच्या तक्रारीप्र्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली होती. परंतू परभणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला नाही. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी आज 30 जुलै रोजी होणार आहे.
त्या अगोदर परभणी पोलीसांनी 4 जुलै 2025 च्या आदेशाचे अपील सर्वोच्च न्यायालयात केले. सर्वोच्च न्यायालयाच्या झालेल्या सुनावणीत न्यायालयाने 4 जुलै 2025 चा आदेश कायम ठेवला आहे. याचा अर्थ पोलीसांना पोलीसांविरुध्द गुन्हा दाखल करावाच लागेल. आजच्या औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या सुनावणीत काय झाले याची सविस्तर माहिती प्राप्त झाली नाही.
संबंधीत बातमी..
निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांडने सोमनाथ सुर्यवंशीच्या आईला 50 लाखांची ऑफर केली होती
