नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडमधील अत्यंत गडगंज श्रीमंत, वेगवेगळ्या व्यवसायाशी संबंधीत व्यक्ती, सोबत पोलीस गनर घेवून वावरणारा व्यक्ती केतन नागडा याच्या मुलाची 31 लाखांची फसवणूक करण्याची हिम्मत दाखविण्यात आली आहे. त्या तक्रारीप्रमाणे दोन जणांविरुध्द भारतीय दंड संहितेच्यानुसार वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. म्हणजे हा प्रकार भारतीय न्याय संहिता लागू होण्यापुर्वीचा आहे. सोबत महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय आस्थापना वरील हितसंबंधांचे रक्षण अधिनियम 1999 सुध्दा जोडण्यात आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील नव्हे तर अनेक जागी नामांकित असलेले केतन नागडा यांचे चिरंजीव जिनेन यांनी दिलेल्यातक्रारीनुसार ते सीटीसेंटर सोनु कॉर्नर येथे आस्थाना ऑक्टोबर 2022 ते जानेवारी 2023 दरम्यान अभिजित रत्नाकर गादेवार (25)आणि त्यांचे वडील रत्नाकर मधुकर गादेवार (58) या दोघांनी जिनेन केतन नागडा आणि त्याचा मित्र सोमेश आग्रवाल यांना पैसे गुंतवण्यास सांगून फायनान्स नावाच्या कंपनीमध्ये आणि तिरुपती ट्रेडींग कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास त्या रक्कमेवर 12 टक्क्याने परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि 31 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास लावून आर्थिक फसवणूक केली आहे. वजिराबाद पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 34 आणि सोबत महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय आस्थापनावरील हितसंबंधांचे रक्षण अधिनियम 1999 मधील कलम 3 प्रमाणे गादेवार पिता पुत्रांविरुध्द गुन्हा क्रमांक 327/2025 दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास वजिरबााद येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक उमाकांत पुणे यांच्याकडे देण्यात आला आहे.
गडगंज श्रीमंत, पोलीसाच्या गनरसाोबत वावरणाऱ्या केतन नागडाच्या पुत्राची आणि त्याच्या मित्राची 31 लाखाला फसवणूक
