नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुका चार महिन्यांत होणार – औरंगाबाद खंडपीठात महा अभिवक्ता यांचे निवेदन 

छत्रपती संभाजी नगर,(प्रतिनिधी)- नांदेड येथील शीख गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुकांशी संबंधित प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित आहे. या प्रकरणावर आज न्यायमूर्ती आर. जी. अवचट आणि न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

सुनावणीदरम्यान, महाराष्ट्र राज्याचे महा अभिवक्ता   व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर राहिले. त्यांनी न्यायालयाला माहिती दिली की, राज्य सरकार चार महिन्यांच्या आत गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुका घेणार आहे. यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख २० ऑगस्ट २०२५ अशी निश्चित केली.

या प्रकरणात सरदार मंजीतसिंघ  यांच्या वतीने रिट याचिका (क्र. 4665/2024) दाखल करण्यात आली होती. सुनावणीदरम्यान, राज्य सरकारच्या वतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर असलेल्या महा अभिवक्ता यांना त्यांच्या निवेदनानंतर, न्यायालयाने चर्चेतून मुक्ततेची परवानगी दिली.

यानंतर वरिष्ठ अधिवक्ता ऍड. राजेंद्र देशमुख न्यायालयात उपस्थित राहिले. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, गुरुद्वारा अधिनियम 1956 नुसार, सध्याचे पदाधिकारी नवीन बोर्ड स्थापन होईपर्यंत आपल्या पदावर कार्यरत राहू शकतात. तसेच, त्यांनी न्यायालयास यासंदर्भात योग्य त्या सूचना देण्याची विनंती केली. त्यांनी हेही नमूद केले की, 

ऍड. देशमुख यांच्या युक्तिवादाला काही आक्षेप नोंदवत  ऍड   गिरासे,  ऍड    कातनेश्वरकर,  ऍड.   माणिक आणि याचिकाकर्ते मंजीत सिंघ यांचे वकील  ऍड  कार्लेकर यांनी विरोध केला.

दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी २० ऑगस्ट २०२५ रोजी ठेवली आहे. मात्र, राज्य सरकारच्या वतीने महा अभिवक्ता यांनी    दिलेल्या  मौखिक निवेदनाच्या आधारे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे की गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुकांची प्रक्रिया लवकरच सुरू होऊन, विहित वेळेत निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!