नांदेड,(प्रतिनिधी)- जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार गंगाराम बळीराम राऊत (45) यांचे आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांचा अंतिम संस्कार त्यांचे मूळ गाव वडेपुरी तालुका लोहा येथे सायंकाळी होणार आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील इतवारा शहर वाहतूक शाखा 2. इतवारात येथे कार्यरत असलेले पोलिस अंमलदार गंगाराम बळीराम राऊत (45) यांचे आज पहाटे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.. त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली असा परिवार आहे. वास्तव न्यूज लाईव्ह सुद्धा राऊत कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.
