नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुजामपेठ जवळ रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या मोठमोठ्या सिमेंट पाईप मध्ये बसून गांजा विक्री करणाऱ्या एका 28 वर्षीय युवकाला विशेष पथक आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पथकांनी अटक केली आहे. त्याच्याकडे 3 किलो 617 ग्रॅम एवढ्या वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ सापडला आहे. त्याची किंमत 72 हजार 340 रुपये आहे,
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 23 जुलै रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण,विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, पोलीस आमदार जाधव, प्रमोद कराहळे, प्रदीप खानसोळे रुपेश दासरवाड, जसपाल सिंघ कालो, कदम, सिरमलवार,विशाल माळवे हे मुजामपेठ येथे पोहोचले, तेथे सिमेंटच्या पाईप मध्ये बसून गांजा विक्री करणाऱ्या शेख इस्माईल शेख इसाक (28) रा. नवी आबादी शिवाजीनगर नांदेड यास ताब्यात घेतले त्याच्याकडे 3 किलो 617 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला. त्याची किंमत 72 हजार 340 रुपये आहे त्याच्यासोबत लखन नावाचा अजून एक युवक होता त्याचे पूर्ण नाव पोलिसांना अद्याप माहीत नाही परंतु शेख इस्माईल शेख इसाक हा नांदेड पोलिसांच्या ताब्यात आहे त्याच्याविरुद्ध एन डी पी एस कायदा 20 (ब) 22 (ब) नुसार गुन्हा क्रमांक 703/ 2025 दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप अधीक्षक सुशील कुमार नायक आणि पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोळकर यांनी कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
सिमेंट पाईप मध्ये गांजा विक्री;एक नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात
