नरेंद्र मोदी इंग्लंडमध्ये, आणि तेथे विचारले जाणार – ‘आमच्या मृतांवर खेळ का?
अहमदाबाद विमानतळाजवळ बोईंग कंपनीचे एक ड्रीमलाइनर विमान लंडनकडे 242 प्रवाशांना घेऊन निघाले असतांना मात्र, अवघ्या 35 सेकंदातच ते विमान एका इमारतीवर कोसळले. विमानातील इंधनामुळे मोठा स्फोट झाला आणि त्यातून निर्माण झालेली सुमारे 5000 अंश सेल्सियस इतकी उष्णता इतकी भयंकर होती की, एक वगळता सर्व प्रवासी जागीच मृत्युमुखी पडले.ज्या इमारतीवर विमान आदळले त्यात असलेले डॉक्टरही मरण पावले. आजूबाजूच्या परिसरातही उष्णतेमुळे बरेच लोक मृत्युमुखी पडले. एकूण मृतांचा आकडा सुमारे 269 पर्यंत गेला आहे. यादी तयार करण्यात आली, मात्र प्रत्येक मृतदेह कोणाचा हे ओळखणे अशक्यच होते.त्यामुळे सरकारने डीएनए तपासणी करून प्रेत ओळखून परत केल्याचे मोठ्या दिमाखात जाहीर केले. पण खरी परिस्थिती आणखी भयानक आहे.
एका प्रेतासोबत दोन मुंडके, आणि एक चुकून दिलेला मुलगा
एका ठिकाणी एका मृतदेहासोबत दोन मुंडकी पाठवण्यात आली. संबंधित नातेवाईकांनी सरकारला सांगितले की, “आमच्या मयताजवळ फक्त एकच डोके होतं,” त्यामुळे त्या प्रकरणात त्यांनी एक वेगळा मुंडक परत केलं.

हे काही संपण्याआधी आणखी भयंकर बातमी इंग्लंडहून आली. इंग्लंडचे 52 प्रवासी, पण 12 प्रेत ‘त्यांचेच’ नाहीत! त्या ड्रीमलाइनरमध्ये 52 ब्रिटिश प्रवासी होते. इंग्लंडमधील अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. त्यांना पाठवलेली 12 प्रेतं त्यांच्या नागरिकांचीच नाहीत! त्यामुळे ही प्रेतं परत भारतात पाठवली जात आहेत.विशेष म्हणजे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंग्लंडमध्येच आहेत.जर आम्ही म्हणालो की “प्रेतांवरही राजकारण झाले”, तर ते चूक ठरेल का?
पीडित कुटुंबीयांनी सांगितले की, “आम्हाला जी प्रेतं मिळाली, त्यापैकी 12 प्रेतं आमच्या देशातीलच नाहीत.” केवळ प्रेत मिळालं नाही हा प्रश्न नाही. ज्यांना चुकीची प्रेतं दिली गेली, त्यांच्या भावना कुठे जातील? त्यांना किती खोल मानसिक आघात बसला असेल? ब्रिटिश अधिकारी म्हणाले की, ही 12 प्रेतं भारतातून डीएनए टेस्ट करूनच पाठवली गेली होती. पण इंग्लंडमध्ये पुन्हा तपासणी केली असता, ती नातेवाईकांच्या डीएनएशी जुळतच नव्हती. प्रेत बदलले, अंत्यसंस्कार रद्द, धार्मिकतेवरही घाला, ब्रिटिश वकील जेम्स हिली प्रॅन्क यांनी स्पष्ट सांगितले की, “बारा प्रेतं बदलून पाठवण्यात आली आहेत.” तपासणी कोरोनर कोरेनल यांनी केली असून त्यांनी हे अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, “ही प्रेतं ब्रिटिश नागरिकांची नाहीत.”या प्रकारामुळे अनेक कुटुंबांनी अंतिम संस्काराचे कार्यक्रम रद्द केले आहेत. डेली मेल शी बोलताना वकील जेम्स म्हणाले, “पीडित कुटुंबांना फक्त त्यांचा प्रियजन परत हवा आहे. जिवंत नाही, निदान योग्य मृतदेह तरी.”
प्रश्न धार्मिकतेचाही
या बदललेल्या प्रेतांमुळे धार्मिक विधींचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. ब्रिटनमध्ये प्रेत दफन केले जाते, तर भारतात हिंदूंपैकी बहुसंख्य लोक जाळून अंत्यसंस्कार करतात.जर ब्रिटिश नागरिकांचे प्रेत चुकून भारतात हिंदू पद्धतीने जाळण्यात आले असेल, तर त्यांच्या नातेवाईकांसाठी हे अत्यंत भावनिक आणि धार्मिक धक्का ठरू शकतो.
भारत सरकार, एअर इंडिया आणि बोईंग – एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात
भारत सरकार, एअर इंडिया आणि डीजीसीए हे सर्व बोईंग कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पायलट अत्यंत अनुभवी होते, त्यामुळे त्यांच्या चुकीची शक्यता कमी आहे.
अमेरिकन वृत्तसंस्थांच्या मते, अपघाताचे पायलट चुकी मुळे झालं. भारत मात्र याला प्राथमिक तपासणीचा निष्कर्ष म्हणत आहे. एअर इंडियाचे सीईओसुद्धा बोईंगच्या बाजूने बोलत आहेत, परंतु बोईंग कंपनीतील व्हिसल ब्लोअर्स आणि इंडियन पायलट असोसिएशन मात्र सरकारच्या या भूमिकेवर नाराज आहेत.
तपासणीचा अहवाल लांबणीवर – जनता विसरून जाईल यासाठी?
ड्रीमलाइनर अपघाताचा अंतिम अहवाल 3 महिन्यांत येणार होता. आता भारताचे नागरी उड्डाण मंत्री रेड्डी यांनी सांगितले की, तो अहवाल सहा महिन्यांत येईल.का? कारण भारतीय जनता लगेच विसरते. लोक विसरतील आणि मग मृत पायलटवर दोष टाकून प्रकरण बंद करता येईल.
30 एकर जागा – निर्णय झाला, अंमलबजावणी नाही
अहमदाबाद विमानतळाजवळ 30 एकर जमिन एअरपोर्टला देण्याचा निर्णय 2018 मध्येच झाला होता. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी त्याला मंजुरीही दिली होती. पण ती जागा आजतागायत हस्तांतरित झाली नाही. दुर्दैवाने, ते स्वतःही त्या अपघातात मरण पावले.
मोदी इंग्लंडमध्ये – आणि तिथे विचारले जाणार हेच प्रश्न
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्लंडमध्ये आहेत. त्यांना विचारले जाईलच की, “आमच्या 12 नागरिकांच्या प्रेतांवर जो खेळ झाला, तो किती नीच होता!”प्रेत दिली जातात तेव्हा ती खरी आहेत का, याची खात्रीही घेतली गेली नाही. हा मानवी संवेदनेचा अपमान आहे.
“मोदी है तो मुमकिन है” असे शब्द पत्रकार अशोक वानखेडे यांचे आहेत. पण अशा गोष्टींसाठी?हा आहे नवीन भारत, जो ‘विश्वगुरू’ असल्याचे दावे करतो. पण सत्य हेच आहे की, आपण फक्त गोड शब्द वापरतो, कृतीत काहीच उरत नाही.
