नांदेड : पुष्पा जगदीश कदम(६८) यांचे अल्पशा आजाराने येथील खाजगी रूग्णालयात आज निधन झाले असून आज दि.२२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता कैलासनगर(भाग्यनगर चौरस्ता)येथून अंत्ययात्रा निघून गोवर्धनघाटला अंत्यविधी करण्यात येणार आहेत.पुष्पा कदम या जिल्हा परिषदेच्या हायस्कूल मध्ये सहशिक्षिका ते मुख्याध्यापिका असा प्रवास त्यांनी केला आहे .नांदेड येथील मुलींचे हायस्कूल आणि मालेगाव येथील जि.प.हायस्कूल येथे दीर्घकाळ सेवा बजावली.उत्कृष्ट शिक्षिका म्हणून जिल्हा परिषदेतर्फे गौरव.कुरूंदा येथील दिवंगत स्वातंत्र्य सैनिक नानासाहेब दळवी यांच्या कन्या तसेच साहित्यिक डॉ.जगदीश कदम यांच्या पत्नी.त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून,दोन नातू असा परिवार आहे.
More Related Articles
सेवानिवृत्त पोलीसांनी निवडणुक काळात सेवा द्यावी-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार
नांदेड(प्रतिनिधी)-सार्वत्रिक लोकसभा पोट निवडणुक आणि विधानसभा निवडणुकीसाठी सेवानिवृत्त झालेल्या पोलीसांनी आपल्या सेवा द्याव्यात असे पत्र…
पोलीस महासंचालकांच्या बदली आदेशाला नांदेड पोलीस परिक्षेेत्रातील अधिकारी मानत नाहीत
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रात बऱ्याच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस महासंचालकांनी केलेल्यानंतर सुध्दा काही तरी कारणे सांगून,बनावट…
नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी सुट्टी
नांदेड – राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी संबंधित स्थानिक…
