नांदेड(प्रतिनिधी)-मुलभुत सोयी सुविधेच्या अंतर्गत मनपा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये सीसी रोडचे काम 120 लाख रुपयांचे असतांना ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार युवा सेना उपजिल्हाप्रमुख सचिन पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या विषयास शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर तसेच कनिष्ठ अभियंता संदीप पाटील यांच्याशी वारंवार पत्र व्यवहार करून सुध्दा या चुकीच्या आणि निकृष्ट कामाकडे परंतू त्यांनी काही लक्ष दिले नाही. हे सर्व अधिकारी कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहेत. मनपा आयुक्त महेश डोईफोडे यांना भेटून सुध्दा काही चौकशी झाली नाही. स्वस्तीक इंटरप्रायझेसचे रंगराव सोनाजीराव या ठेकेदाराची बिले न अदा करता ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे आणि कामाची चौकशी लावली नाही तर दोन-चार दिवसात महानगर पालिका कार्यालयासमोर या निवेदनात नमुद आहे.
निकृष्ट कामाची चौकशी लावली नाही तर उपोषण करणार-सचिन पाटील यांचे निवेदन
