नांदेड -नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या वतीने पीपल्स कॉलेजच्या मैदानावर 7 व 8 जुलै 2025 रोजी जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ग्यान माता विद्या विहार शाळेच्या संघाने सहभाग नोंदवीत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. लातूर येथे होणार्या आंतरजिल्हा सुब्रतो मुखर्जी विभागीय फुटबॉल स्पर्धेत नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व ग्यान माता शाळा करणार आहे.
ग्यान माता विद्या विहार शाळेने बाद फेरीच्या सामन्यांमध्ये 5-0 गोलच्या फरकाने विजय संपादन केला आहे. अंतिम फेरीत सना इंटरनॅशनल स्कूल नांदेडच्या संघावर 5-1 अशा फरकाने मात देवून विजय नोंदवीत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
दि. 20 जुलै 2025 रोजी लातूर येथे होणार्या विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी शाळेचे प्राचार्य फादर ईग्नाथी, उपप्राचार्य फादर अॅनसन, शाळेचे अधीक्षक फादर आनंद, सिस्टर्स, क्रीडा शिक्षक विष्णू शिंदे, फेलिक्स पिल्ले, अलेक्स, सौ. श्वेता ठाकूर, सौ. यदुकृष्णा, शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शाळेच्या संघाला शुभेच्छा दिल्या.
