नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथील भाजी मंडईजवळ एका शेतकऱ्याने बॅंकेतून काढलेली एक लाख रुपये रक्कम दुचाकीवर अडकलेल्या पिशवीतून चोरीला गेली आहे. काही दिवसांपुर्वीच तामसा येथे असाच प्रकार घडला होता.
पळसा ता.हदगाव येथील देवानंद किशनराव निमडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 जुलैच्या दुपारी 2 वाजेच्यासुमारास त्यांनी एसबीआय बॅंकेतून शेतीच्या कामासाठी 1 लाख रुपये रोख रक्कम काढली. रक्कम असलेली पिशवी त्यांनी दुचाकीच्या हॅन्डलमध्ये अडकवली आणि भाजी खरेदी करू लागले. तेवढ्यातच 1 लाख रुपये असलेली पिशवी चोरीला गेली आहे. हदगाव पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 233/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार जुडे अधिक तपास करीत आहेत.
शेतकऱ्याचे 1 लाख रुपये चोरीला गेले
