आम्ही वाचकांना सांगतोय, विश्वास बसेल का तुमचा आमच्या शब्दांवर? पण हे खरं आहे, क्युबा देशात फक्त भिकाऱ्यांबद्दल केलेल्या वाईट वक्तव्यामुळे त्या देशाच्या महिला मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला.ज्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या नाव मारता येलेना. त्या म्हणाल्या की, “रस्त्यांवर फिरून वस्तू गोळा करणारे लोक हे भिकारी नाहीत, ते केवळ अभिनय करत आहेत.” या वक्तव्यानंतर त्या देशातील जनता संतप्त झाली, लोक रस्त्यावर उतरले. इतकंच नव्हे तर परदेशात राहणाऱ्या त्या देशाच्या नागरिकांनीही सरकारवर ताशेरे ओढले.म्हणूनच आम्ही म्हणतो, मंत्री कितीही मोठा असला तरी जनता त्याच्यापेक्षा मोठी असते. एका लोकशाही देशात जनतेचा अपमान करणाऱ्याला त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो, हे या घटनेतून दिसून येते.या घटनेवर त्या देशाचे राष्ट्रपती मेजर झियास का कालेन यांनी संसदेमध्ये मंत्री येलेनावर टीका करताना म्हटलं, “नेतृत्वाला जमिनीवरच्या लोकांना समजून घेणं गरजेचं असतं, आणि सहानुभूतीशून्य असणं हे नेतृत्वाला शोभत नाही.”पुढे मंत्री येलेना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा म्हणजे कोणत्याही लोकशाहीसाठी एक आदर्श ठरावा.

अमेरिकेच्या विरोधात उभा राहिलेला एक छोटा देश, पण मोठ्या मनाचाहा देश आहे क्यूबा. अमेरिका या देशावर गेल्या अनेक दशकांपासून निर्बंध घालतोय. व्यापारबंदी, औषधांची कमतरता, आर्थिक व्यवहारांवर बंधनं, डॉलरमध्ये व्यवहार करणाऱ्यांवरही शिक्षा – अशा अनेक प्रकारचे दडपशाहीचे प्रयत्न क्यूबावर करण्यात आले.तरीही क्यूबा तग धरून उभा आहे.क्यूबात लोकांना मोफत आरोग्यसेवा, मोफत शिक्षण, घर, जेवण आणि मूलभूत गरजा पूर्ण केल्या जातात. तिथे कोणाचेही घर भाड्याचं नाही. प्रत्येकाला सरकारकडून घर दिलं जातं. आज जगात डॉक्टरांची सर्वाधिक संख्या प्रति व्यक्ती प्रमाणात क्यूबात आहे.कोरोनाच्या काळातही क्यूबाने स्वतःची लस तयार केली “. सुव्हराना ०२” आणि “अबडाला” असे त्या व्हॅक्सिनचे नाव आहे. अमेरिकेच्या दबावामुळे कोणतंही देश त्यांना मदत करत नव्हता, तरीही त्यांनी हार मानली नाही.
क्युबाचा इतिहास, संघर्ष आणि आत्मभान असे आहे कि, १९६१ साली क्यूबामध्ये पहिली क्रांती झाली. फिदेल कॅस्ट्रो, चे ग्वेरा यांसारख्या नेत्यांनी अमेरिकेच्या वर्चस्वाला तोंड दिलं. तेथील सर्व अमेरिकन कंपन्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. अमेरिका चिडली, आणि निर्बंध आणले. पण क्यूबाने पाठ फिरवली नाही.क्यूबातील शिक्षक, वैद्यकीय कर्मचारी, शास्त्रज्ञ हे फक्त क्यूबासाठी नव्हे, तर जगासाठी योगदान देतात. अफ्रिकेतील स्वातंत्र्य संग्रामातही क्यूबाने मदत केली.आजही तिथे ३०-४० वर्षे जुने वाहनं चालतात. पण लोकांचे आयुष्य समाधानकारक आहे. कुणी भुकेने मरत नाही, कुणी भिक मागताना दिसत नाही.
क्युबा कडून आपण काय शिकू शकतो? भारतात अनेक कुटुंबं आजही अशा परिस्थितीत आहेत की, मुलं आजारी पडली तर उपचार परवडत नाहीत. शिक्षण, आरोग्य, निवारा हे अजूनही स्वप्नवत वाटतात.क्यूबासारख्या देशात मंत्री जर भिकाऱ्यांना वाईट बोलले, तर त्यांना तात्काळ पद सोडावं लागतं. ही संवेदनशीलता भारतात दिसते का? आपल्या देशात नेते मोठे असतात, पण सामान्य माणूस छोटा समजला जातो.नौकिक न्यूज डॉट कॉम चे गिरीश वशिष्ठ म्हणतात,
“माझ्या मते क्यूबाच्या सरकारबद्दल, त्याच्या लोकांबद्दल आणि तिथल्या मानवतावादी धोरणांबद्दल आदर वाटतो.
एखादा मंत्री गरीबांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करतो, आणि त्याला दरवाजा दाखवला जातो – हीच खरी लोकशाही.”
म्हणूनच आम्हाला वाटतं, क्यूबासारखी उदाहरणं आपण आपल्या देशासाठीही बोध घेण्यासाठी वापरायला हवीत.
लोकशाही म्हणजे निवडणूक नव्हे, ती म्हणजे जनतेसाठी आणि जनतेकडून चालणारी सत्ता.

