नांदेड(प्रतिनिधी)-अमरनाथ यात्रा ही भक्तीसाठी केली जाते आणि ती कोणत्याही दुर्घटनेशिवाय किंवा घटनेशिवाय पुर्ण व्हावी अशी माझी ही इच्छा आहे असे प्रतिपादन एमआयएमचे प्रमुख असदोद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केली.
आज न्यायालयात त्यांच्याविरुध्द सुरू असलेल्या खटल्यासाठी ते नांदेडमध्ये आले होते. त्यांनी सांगितले की, आज आमच्यावर ठेवण्यात आलेल्या दोषारोपाला नकार दिला आहे. आता पुढील प्रक्रिया सुरू होईल. या प्रसंगी कमी वजन आणि ज्याची कोळसा खान आहे असे प्रसिध्द असलेल्या पत्रकाराने अमरनाथ यात्रेत कोई हादसा नही हुवा असा प्रश्न विचारला तेंव्हा ओवेसी म्हणाले की, अमरनाथ यात्रा माझ्या हिंदु बांधवांच्या श्रध्देची यात्रा आहे आणि ती निर्विघ्न व्हावी अशी माझीही इच्छा असल्याचे सांगितले. याच पत्रकाराने आता पुढे सभांसाठी परवानगी घेणार काय असा प्रश्न विचारला तेंव्हा ओवेसी म्हणाले आम्ही परवानगी घेत नाही असे कोणी सांगितले आणि तुम्ही पोलीसचे खाजगी व्यक्ती आहात काय? असा प्रतिप्रश्न विचारला. गौतम अडाणीच्या वृत्तवाहिनीमध्ये असलेल्या पत्रकाराने मस्जिदीवरील भोंग्यांच्या आवाजाबद्दल आपले अद्भुत ज्ञान व्यक्त करत त्याच्या ऍम्पीयरमधील फरक विचारला. तेंव्हा ओवेसी म्हणाले एकाच समुदयाला टार्गेट केले जात आहे आणि ही बाब अत्यंत दुर्देवी आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एमआयएम पक्ष लढविणार आहे. त्याची तयारी सुरू आहे आज सुध्दा बैठक आहे आणि पुढे सुध्दा मी नांदेडला येणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आमच्या धोरणांचे जाहीरीकरण करू असे सांगितले. महाराष्ट्रामध्ये शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत. युवकांना महाराष्ट्र सरकार रोजगार देवू शकत नाही. लाडक्या बहिण योजनेचा बट्याबोळ झाला आहे. पण महाराष्ट्र शासन एका समुदयाविरुध्द बोलून काय साध्य करणार आहे हे मलाच कळत नाही असे ओवेसी म्हणाले.
जम्मू काश्मिरच्या उपराज्यपालांनी पहलगाम हल्यात सुरक्षेत चुक झाली हे मान्य केले याबाबत बोलतांना ओवेसी म्हणाले त्यांनी मान्य केले आहे तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा. मुळात आम्ही मोदी सरकारला हा प्रश्न विचारू इच्छीतो की, आतंकवादी त्या ठिकाणी पोहचले कसे याचे जबाबदार कोण? तेथे तर जाणे अवघड आहे. आज मी न्यायालयात आलो, तुम्हाला माहिती मिळाली आणि तुम्ही मला भेटायला आलात तर मग सरकारला आतंकवादी आल्याची माहिती कशी मिळाली नाही. या प्रश्नांना आम्ही पावसाळी अधिवेशानात उपस्थित करणार आहोत.
बिहार राज्यात निवडणुकींच्या निमित्ताने मतदारांची नागरीकता तपासली जात आहे. ही बाब चुकीची आहे. तपासायला माझी हरकत नाही. परंतू त्यासाठी दिलेला वेळ अत्यंत अल्प आहे. पुढे तर असेही सांगितले जात आहे की, हे भारतात होणार आहे. सन 2019 मध्ये शासनाने लोकसभेत हे जाहीर केले होते की, 2016 ते 2018 दरम्यान निवडणुक मतदारांमध्ये विदेशी नागरीकांचे फक्त तिन नाव आले होते. मग आज बांग्लादेशी, नेपाळ आणि म्यानमार येथील नागरीक मतदार आहेत असे कसे मान्य करावे. वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून विदेशी नागरीक सापडले हा प्रचार खोटा आहे. सन 2002 मध्ये 13 टक्के लोकांनीच जन्म नोंद केलेली आहे आणि सन 2005 मध्ये फक्त 16 टक्के लोकांनी बिहारमध्ये जन्म नोंद केलेली आहे. करोडो बिहारी बांधव बिहार सोडून दुसऱ्या राज्यात कारभार करता, नोकऱ्या करतात. मग त्यांना हा वेळ कसा मिळेल हा प्रश्न आहे.
हिंदु बांधवांची अमरनाथ यात्रा निर्विघ्न पार पडावी-असदोद्दीन ओवेसी
