आजकाल “एक राजकीय नेता किती खाली जाऊ शकतो?” हे म्हणणं सहज झालं आहे. पण तो किती नीच असू शकतो, किती घाणेरडा, स्वार्थी, आणि जगासाठी किती मोठा धोका ठरू शकतो याची अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासात दिसतात, हिटलरपासून ते आजच्या काळापर्यंत.

आज आम्ही अशाच एका नेत्याची वास्तविकता तुमच्यासमोर मांडत आहोत. सहा महिन्यांच्या गुप्त शोध पत्रकारितेतून त्याच्याबाबत अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. साम, दाम, दंड आणि भेद या चारही नीती वापरून त्याने आपली सत्ता टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.जेव्हा वाचकांनी हे सर्व वाचलं, तेव्हा त्या नेत्याला समोर पाहिल्यावर तुम्ही त्याला चपलेने माराल, एवढा संताप येईल. ही माहिती न्यूयॉर्क टाइम्सच्या इन्व्हेस्टिगेशन टीमने उघडकीस आणली आहे. न्यूयॉर्क टाइम्सने केलेली ही शोध पत्रकारिता इतकी सखोल आणि धाडसी आहे की आजवर कोणीही अशा पद्धतीने पत्रकारिता केलेली नाही.न्यूयॉर्क टाइम्सचे पत्रकार रोलिंग बर्गमन,पॅट्रिक रिस्लीब,नातन ऍडम हायमर यांच्या त्रिकुटाने हि शोध पत्रकारिता आहे. या तीन पत्रकारांनी सहा महिने हे काम गुप्तपणे केले. त्यांनी 110 हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ज्यामध्ये अमेरिका, इस्रायल आणि अरब देशांचे अधिकारी होते. त्यांनी अनेक गोपनीय दस्तऐवज, युद्ध योजना, न्यायालयीन रेकॉर्ड्स आणि बैठकींच्या नोंदी तपासल्या. या नेत्याविरुद्धचा तपास इतका मोठा आहे की त्यावर स्वतंत्र पुस्तक लिहिलं जाऊ शकतं. खुद्द इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर हे संशोधन केंद्रित आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्या ठिकाणाचीही चौकशी करण्यात आली आहे. त्यांचं घर, गुप्त लष्करी मुख्यालय, आंतरराष्ट्रीय बैठका या सर्वांची माहिती मिळवण्यात आली आहे.मीडिया अशा ठिकाणी पोहोचू शकत नाही, पण ही शोधपत्रकारिता केवळ माध्यमांची मर्यादा ओलांडणारी नाही, तर ती नागरी सत्य उघड करणारी आहे. आजही जगभरातील नागरिक जेव्हा हे सत्य ऐकतील, तेव्हा त्यांच्या अंगावर काटा येईल.
नेतान्याहूंनी देशभक्ती, धर्म, जात आणि समाजाच्या नावावर फक्त आपली खुर्ची वाचवण्यासाठी देशाला कमकुवत केलं आहे. 2023 मध्ये इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांना सांगितलं होतं की, “तुमच्या निर्णयांमुळे देश कमजोर होत आहे, जनता रस्त्यावर आहे, आणि याचा फायदा उचलून हमास हल्ला करू शकतो.”त्यानंतर नेतन्याहूंनी असा कायदा आणण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे त्यांना शिक्षा झाली तरी सत्तेवर परिणाम होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. देशातील गुप्तचर यंत्रणांनी याला विरोध केला, पण त्यांनी तो कायदा पास करून घेतला. त्यामुळे देशात आणि लष्करात दोन गट पडले.
7 ऑक्टोबरच्या हल्ल्याबाबत नेतन्याहूंनी खोटं बोललं. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून जबाबदारी मोसाद या गुप्तचर यंत्रणांवर टाकली. नंतर ती पोस्ट आणि फोन कॉल डिलीट करण्यात आले. त्यामागील हेतू स्पष्ट होता. भविष्यात कोणताही पुरावा राहू नये.2025 मध्ये सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यातील संबंध सामान्य होऊ लागले होते. जनता शांत होऊ लागली होती. तेव्हा नेतन्याहूंनी या संबंधांनाही खीळ घातली, कारण शांततेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावरची प्रलंबित प्रकरणं पुन्हा उघड होण्याची भीती होती.ते सत्तेसाठी इतके हपापले होते की हजारो लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण खुर्ची शाबूत राहावी, अशी त्यांची भूमिका दिसली. 55,000 लोक मारले गेले, त्यामध्ये 10,000 लहान मुले, 20,000 बेघर, 20 लाख लोकांचे घरे जप्त झाली.
आज त्याला युद्ध अपराधी घोषित करण्यात आले आहे. त्याच्यावर अटक वॉरंटही जारी झालं आहे. इस्रायलच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेचा प्रमुख जेव्हा या प्रकरणाची चौकशी करत होता, तेव्हा त्याला पदावरून काढण्यात आलं. कारण, नेतन्याहूंवर भ्रष्टाचाराचे आरोप होते.महाअधिवक्ता संविधानाच्या अनुरूप काम करत होता, म्हणून त्यालाही हटवण्याचा प्रयत्न केला गेला. न्यायालयीन सुधारणा अंमलात आणल्या गेल्या आणि परत मागे घेतल्या, फक्त गोंधळ वाढावा म्हणून.सौदी अरेबिया सोबत जे संबंध सुधारत होते, त्यांनाही मुद्दाम नासवण्यात आलं. कारण, शांतता प्रस्थापित झाली असती तर जनतेने विचारलं असतं, “आता सर्व काही ठिक आहे, मग तुमच्या प्रकरणांचा निकाल काय?” याला टाळण्यासाठीच युद्ध सुरू ठेवलं गेलं.
सद्यस्थितीत हजारो लोकांचा बळी गेलेला आहे. जगाने हमासवर आरोप केला, पण एक गोष्ट समोर आली, नेतन्याहूंनीच हमासला अप्रत्यक्षरीत्या आर्थिक मदत केली होती, आणि जेव्हा त्यांची सत्ता डगमगू लागली, तेव्हा हमासकडून इस्रायलवर हल्ला होतो, असं घडलं.हा नेता केवळ इस्रायलसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे. त्याच्यासारखे नेते आपल्याकडेही आहेत. फक्त खुर्ची वाचवण्यासाठी ते माणसाला माणसाशी लढवतात. घरं उद्ध्वस्त करतात, आणि स्वतःच्या कृतीवर लाज न वाटता गर्व करतात.बलुचिस्तान, पाकिस्तान, अफगाणिस्तान — इथेही अशीच परिस्थिती आहे.शेवटी एक विनंती आहे वाचकांनो, नेत्यांसाठी वेडे होऊ नका. त्यांचं खरं रूप समजून घ्या. देशभक्तीच्या नावावर जेव्हा लोकांचा बळी दिला जातो, तेव्हा तो देशप्रेम नसतो, तर तो असतो, सत्तेचा एक क्रूर खेळ!
