किरिथीका सी एम यांना आता नासिक शहरात पोलीस उप आयुक्त पद

नांदेड,(प्रतिनिधी)-अपर पोलीस महासंचालकपदाच्या दोन बदल्या करत मीरा-भाईंदर- वसई- विरार या पोलीस आयुक्तालयात नवीन पोलीस आयुक्त पाठवण्यात आले आहेत. तसेच एक दिवसापूर्वी केलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पुन्हा तीन बदल करून शासनाने नवीन आदेश काढले आहेत.
मीरा-भाईंदर- वसई- विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांना आता अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) महाराष्ट्र राज्य मुंबई येथे नियुक्ती दिली आहे. त्यांच्या जागी अपर पोलीस महासंचालक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई येथील निकेत कौशिक यांना पोलीस आयुक्त मीरा-भाईंदर- वसई- विरार येथे नियुक्ती दिली आहे.
सोबतच काही सहाय्यक पोलीस अधीक्षकांना अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर पदोन्नती देऊन 10 जणांच्या नवीन नियुक्ती केल्या होत्या. त्यातील तीन जणांच्या नियुक्तींमध्ये बदल केला आहे. किरिथीका सी एम यांना अमरावती शहर पोलीस उपायुक्त म्हणून पाठवले होते. त्यांना आता पोलीस उपायुक्त नाशिक शहर येथे पाठवले आहे. नाशिक शहर येथील पोलिस उप आयुक्त अनिल मस्के यांना अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण या पदावर नियुक्ती दिली आहे. नागपूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांना पोलीस उपायुक्त अमरावती शहर अशी नवीन नियुक्ती बदलून दिली आहे.
