अर्धापूर नगरपंचायत प्रशासनाला धूर फवारणीबाबत मुहूर्त मिळेना ! ;संबंधित गुत्तेदाराची धूर फवारणी बाबत टाळाटाळ ?

अर्धापूर- पावसाळ्याच्या दिवसांत नाल्यांची स्वच्छता आणि नियमित धूर फवारणी हे नागरी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. सहाजिकच ही जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाला पेलायची असते. मात्र पावसाळा सुरू होऊनही प्रशासनाला धूर फवारणीचा मुहुर्तच सापडेलेला दिसत नाही. नगरपंचायत प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे अर्धापूर शहरातील प्रत्येक वॉर्डात डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. हा आणखी वाढून मलेरिया, डेंग्यू, व व्हायरल फिवरचा प्रकोप वाढण्याची जणू अर्धापूर नगरपंचायत प्रशासन प्रतीक्षा करीत असल्याचे दिसते.

डासांच्या प्रादुर्भावाने अर्धापूरकर वैतागले असून

नाल्या चोकअप होऊन पावसाळ्यात घाणीचे साम्राज्य निर्माण होऊ नये, साथीचे आजार बळाऊ नये, यासाठी उन्हाळ्याच्या अखेर शहरातील नाल्यांची स्वच्छता मोहीम राबविणे गरजेचे आहे.

शहरात किटकनाशक फवारणी किंवा धूर फवारणी गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असली तरी संबंधित गुत्तेदार मात्र बिल उचलण्यातच धन्यता मानत आहे .

खासगी दवाखाने व रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या हजारावर असल्याचा अंदाज आहे. शहरातील स्वच्छतेच्या कामाचा ठेका दिला असला तरी साफ सफाई होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत.

यावर्षी नगरपंचायत प्रशासनाने नाल्यांची सफाई केली,मात्र ही सफाई थातूरमातूर होती असे म्हणले तर वावगे ठरू नये . जोरदार पाऊस झाला की नाल्यातील घाण रस्त्यावर येते. असा अनुभव दरवर्षी येतो. यावर्षीही येत आहे. परिणामी नगरपंचायत प्रशासनाची नाले सफाई याहीवर्षी पोकळ ठरली आहे.यासोबतच पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी जमा होत असल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. अशावेळी विविध प्रकारच्या औषधांची फवारणी, धूर फवारणी करणे गरजेचे असते. नागरी आरोग्य अबाधित रहावे, यासाठी नगरपंचायत प्रशासनाने नियमितपणे ही कामे करावयाची असतात. मात्र या कामाचा सध्या नगरपंचायतला विसर पडून धूर फवारणीत कसूर केली जात असल्याचे दिसून येत आहे.

औषधांची फवारणी आणि फागिंग मशीनद्वारे केली जाणारी धूर फवारणी होत नसल्यामुळे अनेक वॉर्डात डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झालाअसून,यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजाराने डोके वर काढणे सुरू केले आहे. शहरात मागील काही दिवसात तापाच्या रुग्णातही वाढ झाली आहे. अनेक रुग्ण साथीच्या आजाराने बाधित होऊन खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. डासांच्या प्रकोपामुळे अर्धापूरकर वैतागले असतानाही नगरपंचायत प्रशासनाला मात्र त्याचे काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत असले तरीही नगरपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने घ्यावे अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!