नांदेड(प्रतिनिधी)-14 व्या वित्त आयोगाच्या मार्फत ग्राम पंचायत राजापूर ता.धर्माबाद येथील माजी सरपंच आणि सध्या ग्राम पंचायत सदस्य महिलेने 8 लाख 38 हजार 600 रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
धर्माबाद येथील गटविकास अधिकारी प्रफ्फुल प्रकाशराव तोटेवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 फेबु्रवारी 2021 ते 26 मे 2022 दरम्यान त्यावेळी सरंपच असलेल्या सावित्रीबाई निलेवार ज्या सध्या राजापुरच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांनी 14 व्या वित्त आयोगाअंतर्गत शासनाकडून आलेले 8 लाख 38 हजार 600 रुपये रक्कम उचलून त्रयस्त पक्षाला रक्कम वाटप केली. या वाटपाचे कोणतेही पुरावे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना चौकशी दरम्यान सादर केले नाही. अशा प्रकारे शासनाची फसवणूक झाली आहे. धर्माबाद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 197/2025 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406 प्रमाणे दाखल केला असून महिला पोलीस उपनिरिक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.
महिला सरपंचाने 8 लाख 38 हजार 600 रुपयांचा अपहार केला
