नांदेड(प्रतिनिधी)-लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या बार्टी(डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) येथील कंत्राटी जिल्हा प्रकल्प अधिकारी महिलेला नांदेड येथील विशेष न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
एका विद्यार्थ्याच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी लागणारे अनुसूचित जाती-जमाती प्रमाणपत्र पडताळणी करून हवे होते. पहिल्यांदा हा अर्ज तांत्रिक कारणानी नामंजुर झाला. त्यामुळे त्या अजर्र्दार महिलेने दुसरा अर्ज केला. तेंव्हा नांदेडच्या समाज कल्याण कार्यालयाच्या परिसरात बार्टीचे कार्यालय आहे. त्यात कंत्राटी पध्दतीवर समता दुत प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी सुजाता मधुकरराव पोहरे या कार्यरत आहेत. त्यांच्या कक्षात मुलाचे जातीचे प्रमाणपत्र पडताळणी करून हवे असेल तर 30 हजार रुपये लाच मागितली. खरे तर हे प्रमाणपत्र पडताळणी करण्याचे अधिकार सुजाता पोहरेकडे नाहीत. परंतू पडताळणी समितीचे कार्यालय त्यांच्या कक्षा शेजारीच आहे. म्हणून त्यांनी हा ठेका घेतला.
काल दि.3 जुलै रोजी असे ठरले की, 15 हजार रुपये आता द्यावेत आणि 15 हजार रुपये पडताळणी झाल्यावर द्यावेत आणि 15 हजार रुपये लाच स्विकारताच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सुजाता मधूकरराव पोहरे यांना अटक करण्यात आली. आज पोलीस निरिक्षक करीम खान पठाण, पोलीस अंमलदार प्रदीप खंदारे, मेनका पवार आदींनी न्यायालयात हजर केले. विशेष न्यायालयाने सुजाता पोहरेला एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने ॲड.रणजीत देशमुख यांनी बाजू मांडली.
15 हजारांची लाच स्विकारणाऱ्या महिलेला पोलीस कोठडी
