नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये 22 जून रोजी दारु विषयक 158 लोकांविरुध्द 158 गुन्हे दाखल करून 6 लाख 5 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानंतर 22 जून रोजी नांदेड पोलीस परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर व हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी हात भट्टी दारू, दारुचे रसायन, देशी दारु, विदेशी दारु आणि शिंदी या अंमली पदार्थांविरुध्द कार्यवाही करत एकूण 6 लाख 5 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी 158 लोकांविरुध्द 158 गुन्हे दाखल केले आहेत. ही कार्यवाही पुर्ण करण्यासाठी परिक्षेत्रातील 168 अधिकारी आणि 546 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी जनतेला आवाहन केले आहे की, आपल्या भागातील अवैध धंद्यांची माहिती संबंधीत पोलीसांना द्यावी आणि पोलीस करत असलेल्या मोहिमेला हातभार लावावा.
नांदेड-हिंगोली-परभणी आणि लातूर या चार जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी दारु संदर्भाने 158 गुन्हे दाखल
