नांदेड(प्रतिनिधी)-मुक्रामाबाद पोलीसांनी 20 जून रोजी दापका (गु) शिवारात एक चोरट्या वाळूची हायवा गाडी 28 लाख रुपयांची आणि त्यातील चोरटी वाळू 45 हजार रुपयांची असा मुद्देमाल जप्त केला आहे.
मुक्रामाबाद येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू गोपाळराव चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आणि त्यांचे सहकारी 20 जून रोजी रात्री गस्त करत असतांना 2 वाजेच्यासुमारास दापका (गु) शिवारात एम.एच.26 सी.एच.6767 हा 28 लाख रुपये किंमतीचा ट्रक तपासला त्यामध्ये 45 हजार रुपये किंमतीची 9 ब्रास अवैध वाळू भरलेली होती. पोलीसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे. औराद शाहजानी जि.बिदर (कर्नाटक) येथील अरविंद बाबूराव माने (27) याच्याविरुध्द मुक्रामाबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 95/2025 दाखल केला आहे. देगलूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांनी मुक्रमाबाद पोलीसांचे कौतुक केले आहे.
मुक्रामाबाद पोलीसांनी चोरटी वाळू वाहतुक करणारा 28 लाखांचा हायवा पकडला
