नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रा.रविंद्र चव्हाण यांनी जिल्ह्यात अंमलीपदार्थ विशेष करून ड्रग्स सहज उपलब्ध असल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे तक्रार केली आहे. या संदर्भाने अनेक जणांनी आवाज उठविला. प्रसार माध्यमांनी सुध्दा अनेक वेळेस या विषयाला उचलले. पण त्याचा काही परिणाम झालेला नाही. वैद्यकीय क्षेत्रांनी सुध्दा या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे अन्न व औषधी प्रशासनाच्या अखत्यारीत जेवढी प्रतिष्ठाणे आहेत. त्यातील अनेकक वादाच्या भोवऱ्या आहेत. तेथून सुध्दा हा ड्रग्स व्यवसाय वेगळ्या पध्दतीने चालतो असे लोक नेहमीच बोलत असतात.
आज नांदेड जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. या बैठकीचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे आहेत. जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी आजच्या बैठकीला हजर होते. खा.प्रा.रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले की, मी जिल्ह्यातील अनेक प्रश्नासंदर्भाने पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे सादरीकरण केले आहे. त्यातही विशेष करून खा.प्रा.रविंद्र चव्हाण यांनी पत्रकारांना सांगितले की, महाराष्ट्रात नांदेड हे शैक्षणीक हब आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची विद्यार्थी, विद्यार्थींनी नांदेड शहरात वास्तव्य करून आपले शैक्षणिक मार्गक्रमण करतात. ही संख्या एवढी मोठी आहे की, अनेक शिकवणींना सोन्याचे दिवस आलेले आहेत. पण त्यासोबत या विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्स सोबतच इतर काही अंमलीपदार्थांची सवय सहज लागलेली दिसते. कारण ड्रग्स किंवा अंमलीपदार्थ उपलब्ध करून देणाऱ्या लोकांचे त्यातून चांदभले होत असते आणि एकदा ही सवय लागली की, ती बंद होणे खुप अवघड असते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुध्दा खुंटीवर टांगले जाते आणि ज्या आई-वडीलांनी आपल्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांचे स्वप्न धुळीने माखले जातात.
आज खा.प्रा.रविंद चव्हाण यांनी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर मी या बाबी संदर्भाने तपासणी करतो असे सांगितले आहे. खरे तर ड्रग्सच्या धंद्यावर कोणाचे नियंत्रण असते, कोणी ते रोखावे याची जबाबदारी सुनिश्चित करून त्या संबंधीत व्यक्तींवर कडक कायदेशीर कार्यवाही सुध्दा होणे आवश्यक आहे. पालकमंत्री अतुल सावे, पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले आणि पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांना सांगितील. पण खा.प्रा.रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितीत केलेला मुद्दा सिध्द कोण करून दाखवणार आणि कोण ड्रग्सचा व्यवसाय करतो, कोण पुरवठा करतो, कोठे पुरवठा होतो आणि कसा होतो हे शोधण्याची जबाबदारी प्रशासनातील ज्या लोकांची आहे त्यांनी हे करायला पाहिजे. हे कोण आहेत असे जर लिहिले तर पोलीस प्रशासन पुराव्यासह माहिती द्या अशा नोटीसा पत्रकारांना पाठविते असा आहे हा कारभार.
पोलीसांना पाणी पिऊ दिले नाही
जिल्हा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बऱ्याच सोयी उपस्थितांसाठी केल्या जातात. त्यात सर्वात महत्वाची सोय म्हणजे पिण्याचे पाणी. पाणी कोणाला पाणी पाजणे हा एका अर्थाने धर्म मानला जातो आणि दुसऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी सुध्दा पाणी पाजले हे दोन शब्द वापरले जातात. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ज्या पाण्याच्या उल्लेख आम्ही करत आहोत. ते पाणी खऱ्या अर्थाने धर्माचेच काम आहे. त्या ठिकाणी ज्यांच्याकडे ही जबाबदारी होती. त्यातील काही मंडळी पोलीसांना पाण्याच्या बाटलीला हात लावू देत नव्हते. खरे तर प्रशासन पोलीसांना आज च्या बैठकीतील सुव्यवस्था राखण्यासाठी काही वेगळे मानधन देत नाही. त्यांची पगारच या कामासाठी त्यांना मिळते. परंतू नियोजन समितीच्या बैठकीत बरेच व्हीआयपी लोक असतात. त्यामुळे पोलीसांचा क्रमंाक हा शेवटी लागतो आणि त्यातल्या त्या अशा वेळेस पोलीस अंमलदारांचा नंबर कोणता असतो हे ठरविणेच अवघड आहे. परंतू हेच पोलीस अंमलदार पाऊस, उन्ह, वारा याचा काही विचार न करता व्हीआयपी लोकांच्या बंदोबस्तांसाठी आपले रक्त जाळत असतात. अशा वेळेस त्यातील काही जणांनी जर व्हीआयपीसाठी आणलेल्या पाण्याच्या बॉटलमधून काही बॉटल्या घेवून स्वत:ची तहान भागवली तर कोणाचे काही बिघडत नाही. नाही तर निवडणुकीच्या दरम्यान आम्ही पाहिलेले आहे. की, निवडणुकीत शेवटच्या स्तरावर काम करणाऱ्यांना लोकांना पुरीभाजी भेटते आणि वातानुकूलीत कक्षात बसून आदेश प्रसारीत करणाऱ्यांसाठी पुरणपोळीची सोय होते. असो घडलेला प्रकार पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या लक्षात आला. मग त्यांनी पाण्याच्या मालकाला चांगलेच पाणी पाजले. पण असे घडू नये एवढी अपेक्षा वास्तव न्युज लाईव्हची सुध्दा आहे.
नांदेड जिल्ह्यात विद्यार्थ्यांना सहज ड्रग्स उपलब्ध-खा.प्रा.रविंद्र चव्हाण
