नांदेड,(प्रतिनिधी)- उस्माननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कापसी ते गोळेगाव जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी चोरटी वाळू भरलेला एक टिप्पर पकडला आहे. त्यात एकूण चार लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार आप्पाराव दशरथ वरपडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 18 जून रोजी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास ते आणि त्यांचे सहकारी पोलिसांना कापशी ते गोळेगाव जाणाऱ्या रस्त्यावर गस्त करत असताना, त्यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार या रस्त्यावर असलेल्या कॅनॉल मधून चोरटी रेती वाळू काढून वाहतूक होत आहे. तेथे जाऊन तपासणी केली असता तेथे एम एस 26 एच 7218 क्रमांकाचा एक टिप्पर सापडला.त्यात असलेल्या वाळू संदर्भाने विचारणा केली असता, कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आले नाही म्हणून उस्मान नगर पोलिसांनी संभाजी आत्माराम जाधव (30) टिप्पर चालक आणि ज्ञानेश्वर प्रकाश जाधव (35) दोघे राहणार चिंचोली तालुका लोहा यांच्याविरुद्ध गुन्हा: क्रमांक 120/2025 दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर गाडेकर, पोलीस अंमलदार सुशील कुबडे, नामदेव रेजितवाड, आप्पाराव वरपडे, पवार, कांबळे यांनी ही कार्यवाही केली. कंधारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप यांनी या कार्यवाहीसाठी उस्मान नगर पोलिसांचे कौतुक केले आहे.
More Related Articles
अर्धापूर पोलीसांनी एका युवकाला स्थानबध्द केले
नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर पोलीसांनी अवैध शस्त्र बाळगणे, प्राणघातक हल्ला करणे, दरोडा टाकणे, खूनाचा प्रयत्न करणे अशा प्रकारे…
अर्धापूर पोलीसांनी 30 रेडे पकडले
नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर जवळील पार्डी टोलनाक्याजवळ एका ट्रकमध्ये दाटीवाटीने बांधून वाहतुक होणारे 30 रेडे अर्धापूर पोलीसांनी पकडले…
अपहरण झालेल्या बालिकेच्या आईने असे फेडले पोलिसांचे ऋण
माळाकोळी,(प्रतिनिधी)- आपली आठ वर्षीय बालिका पळवून नेल्या नंतर ४८ तासात तीच शोध घेऊन सुखरूप देणाऱ्याचे…
