नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत सेवा अभिलेख 20 टक्के, पोलीस उपअधिक्षक व पोलीस निरिक्षक यांचे अभिप्राय 20 टक्के, वस्तुनिष्ट लेखी परिक्षा 30 टक्के आणि प्रत्यक्ष मुलाखत 30 टक्के अशा प्रकारे 100 गुणांची परिक्षा घेवून नांदेडचे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी स्थानिक गुन्हा शाखेत 20 आणि बॉम्ब शोध व नाशक पथकात 3 अशा 23 पोलीस अंमलदारांना नुतन नियुक्त्या दिल्या आहेत. पण या पुर्वी या पात्रता नसतांना आलेल्या पोलीस अंमलदारांचे काय आणि आजही स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती नसतांना काम त्याच शाखेत करत आहेत त्यांचे काय ? हा प्रश्न चर्चेला आला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती देतांना सेवा अभिलेख 20 टक्के, पोलीस उपअधिक्षक व पोलीस निरिक्षक यांचे अभिप्राय 20 टक्के, वस्तुनिष्ट लेखी परिक्षा 30 टक्के आणि प्रत्यक्ष मुलाखत 30 टक्के अशा प्रकारे 100 गुणांची परिक्षा घेवून त्या निर्णयानुसार नियुक्त्या देण्यात आल्या. यामध्ये काही जणांना खरेच ती पात्रता आहे. स्थानिक गुन्हा शाखेत मंजुर पोलीस अंमलदारांची संख्या 42 आहे.
नव्याने नियुक्ती देण्यात आलेले पोलीस अंमलदार पुढीप्रमाणे आहेत. नांदेड ग्रामीण येथील संघरत्न सुर्यकांत गायकवाड, श्रीराम गंगाधर दासरे, माधव गणपती माने, ज्ञानेश्र्वर केशवराव कलंदर, सुनिलदत्त रामराव गटलेवार, पोलीस मुख्यालयातील अनिल मुरलीधर बिरादार, रितेश राजेंद्रकुमार कुलथे, आबाराव केशवराव पिंगलवाड, गोविंद नारायण येईलवाड, इतर पोलीस अंमलदार पुढीलप्रमाणे आहेत. इमरान एजाज शेख, मनोज गणपतराव राठोड-वजिराबाद, विनायक विश्र्वनाथराव मठपती-मुदखेड, ज्ञानोबा केशवराव कवठेकर, मोहन उत्तमराव हाके, शेख उमर शेख रजाक-इतवारा, दारासिंग लछमाजी राठोड-विमानतळ, शेख अजरोद्दीन नईमोद्दीन-शिवाजीनगर, संजय लिंगुराम चापलवार-कुंडलवाडी, दिलीपकुमार देवजी चंचलवार-जिल्हा विशेष शाखा, प्रमोद उध्दवराव जोंधळे-भोकर असे हे 23 नवनियुक्त स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार आहेत. सोबतच बॉम्ब शोधक व नाशक पथकात चालक पोलीस अंमलदार रविंद्र राम राठोड, जलद प्रतिसाद पथकातील सचिन हनमंतराव घोगरे आणि एटीसीमधील अनिल लक्ष्मणराव कोलते यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हा शाखेत 23 दबंग पोलीस अंमलदार; बीडीडीएसमध्ये तीन
