*Father’s Day* निमित्त ‘अवकारिका ’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!
सुनिधि चौहानच्या सुमधुर आवाजात श्रोत्यांची मनं जिंकणारे गीत वडिलांच्या दिवसाचे औचित्य साधत ‘अवकारिका ‘ या आगामी मराठी चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याच्या निमित्ताने बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनीधि चौहान मराठी रसिकांच्या भेटीला आली आहे.
या गाण्याचे लेखन, दिग्दर्शन आणि गीतलेखन सीए अरविंद भोसले यांनी केले असून, गाण्याला संगीतकार श्रेयस देशपांडे यांनी श्रवणीय चालीने सजवले आहे.
चित्रपटात अभिनय केलेल्या कलाकारांमध्ये विराट मडके, रोहित पवार, पीया कुसुम्बकर, स्नेहा बळपांडे, नितीन लोंधे, वैभवी कुटे आणि उन्नती माने यांचा समावेश आहे. सर्व कलाकारांनी आपापल्या भूमिकेतून गाण्याला अधिक भावनिक ठरवले आहे. हे गाणं रेडबड म्युझिक या युट्यूब चॅनेल वर प्रदर्शित झाले आहे.
गाण्याच्या तांत्रिक बाजूंवर एक नजर:
मिक्सिंग: तन्मय संचेती
गिटार: विकी हजेरी
व्हायोलिन: अवधूत राहाळकर, दर्शित घरत
सारंगी: गुलाब नवासकर
रेकॉर्डिस्ट: तनय गज्जर
‘अवकारिका ’ चित्रपट आणि त्यातील हे गाणं नक्कीच रसिकांच्या हृदयात स्थान मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.