जीबीएस दुर्मिळ आजाराने ग्रस्त तरुण उपचारानंतर बरा 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात झाला उपचार   

नांदेड  – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूरी नांदेड येथे अपघात विभागात GBS (Guillain-Barre Syndrome) ने ग्रस्त असलेला एक 25 वर्षीय तरुण जेव्हा उपचारासाठी दाखल झाला होता तेव्हा तो चालू शकत नव्हता, बोलू शकत नव्हता व ‍गिळू शकत नव्हता. काही तासांमध्ये श्वासोच्छवासाची क्रिया मंदावली त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले व कृत्रिम श्वासोच्छवास चालू ठेवला गेला. सदर रुग्णांवर प्राध्यापक डॉ. शीतल राठोड व प्रमुख औषधवैद्यकशास्त्र यांचे मार्गदर्शनाखाली एक विशेष आसीयू टिम तयार करण्यात आली होती. सदर टिममध्ये डॉ. उबेद खान, डॉ.कपिल मोरे, डॉ.अंजली देशमुख व डॉ.फारुखी, सहयोगी प्राध्यापक व डॉ. अमितकुमार पोतुलवार व डॉ.मोहन भंडारे सहायक प्राध्यापक होते.

जीबीएस GBS हा प्रकार या दुर्मिळ आजारात आणि झपाट्याने वाढणाऱ्या मज्जास्नायूंच्या आजारामुळे रुग्णाचे शरीर पूर्णतः अकार्यक्षम झाले होते. रुग्णाचे दोन्ही हात व पाय असून नसल्यासारखे Intravenous Immunoglobulin (IVIG) थेरपीसह सातत्यपूर्ण व्हेंटिलेटर व्यवस्थापन आवश्यक ते तातडीचे औषधउपचार करण्यात आले. सदर रुग्ण हा 42 दिवस व्हेंटिलेटरवर कृत्रिम श्वासोच्छवासावर वरिष्ठ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार हे सुरू होते. सदर रुग्णास आवश्यकते प्रमाणे फिजिओथेरपी व मानसरोग तज्ज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यात आले.  सदर रुग्ण हा तब्बल 85 दिवसाच्या उपचारानंतर हळूहळू हालचाल करू लागला. सदर रुग्ण हा आज बोलतोय, हसतोय आणि डॉक्टरांचे आभार मानत घरी जातांना त्याने व त्याच्या नातेवाईक यांनी आनंद व्यक्त केला.

GBS (Guillain-Barre Syndrome)  या दूर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णावर डॉक्टर व परिचर्या संवर्गातील कर्मचारी यांनी जे अथक पूर्ण शर्तीचे उपचार करुन हे साध्य झाल्याचे समाधान व आनंद डॉ.विजयकुमार कापसे, वैद्यकीय अधीक्षक व डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता महोदय डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपूरी, नांदेड यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!