हदगाव तालुक्यातील वडगाव येथे घरफोडून 1 लाख 70 हजारांची चोरी; धर्माबादमधील आंध्र बसस्थानकात 60 वर्षीय महिलेचे गंठण बळजबरी चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे वडगाव ता.हदगाव येथील एक घर चाबीने उघडून चोरट्यांनी 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. तसेच धर्माबादमधील आंध्र बसस्थानक येथे बसमध्ये प्रवेश करतांना 60 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेली आहे.
संदीप विठ्ठलराव वाठोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत त्यांनी आपल्या घराला कुलूप लावून शेताच्या कामासाठी गेले होते. लावलेल्या कुलूपाची चाबी दरवाज्या शेजारी असलेल्या देवळीत ठेवली होती. ती चाबी घेवून कोणी तरी चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि कपाटातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 1 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तामसा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 97/2025 प्रमाणे दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक नरवटे अधिक तपास करीत आहेत.
लिंगवा मुत्तेन्ना बागुला या 60 वर्षीय महिला 2 जून रोजी दुपारी 4 वाजता धर्माबाद येथील आंध्र बसस्थानकामध्ये आल्या होत्या. त्यांना आपल्या घरी कामोल मंडल भैसा जि.निर्मल येथे जाण्यासाठी बसमध्ये प्रवेश करत असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यात असलेली 40 हजार रुपये किंमतीची पोत बळजबरीने तोडून नेली आहे. धर्माबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 152/2025 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक श्रीमती  पवार अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!