नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी 50 लाख रुपये किंमतीचा नोंदणी क्रमांक नसलेला हायवा ट्रक पकडला आहे. त्यामध्ये चोरट्या पध्दतीने 5 ब्रास वाळू भरलेली होती. त्याची किंमत 25 हजार रुपये आहे.
दि.2 जूनच्या मध्यरात्रीनंतर 1.40 वाजेच्यासुमारास लोहा रस्त्यावरील वाडी पाटीजवळ पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर, पोलीस उपनिरिक्षक बाबुराव चव्हाण, पोलीस अंमलदार प्रमोद कऱ्हाळे, भिसे, माळगे हे सर्व गस्त करत असतांना त्यांनी एक नंबर नसलेला हायवा ट्रक पाहिला. त्याला थांबवले असता त्यामध्ये चोरट्या पध्दतीने चोरटी वाळू भरलेली होती. या संदर्भाने गाडी चालक ज्ञानोबा गणपतराव जाधव रा.पिंपळगाव (निमजी) हा चोरट्या वाळू संदर्भाने उत्तरे देवू शकला नाही. तेंव्हा पोलीस अंमलदार प्रमोद कऱ्हाळे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीसांनी गुन्हा क्रमांक 526/2025 दाखल केला आहे. या गुन्ह्यात एकूण पोलीसांनी 50 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
50 लाखांचा हायवा चोरीच्या वाळूसह नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडला
