नांदेड(प्रतिनिधी)-तामसा येथे बॅंकेतून बि बियाणे खरेदी करण्यासाठी काढलेले 90 हजार रुपये चोरट्यांनी लांबले आहेत.
गणपतराव मोहनाजी चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 मे रोजी दुपारी 3 वाजेच्यासुमारास ते स्टेट बॅंक ऑफ इंडिया शाखा तामसा येथे गेले होते. त्यांनी त्यांच्या आणि पत्नीच्या खात्यातून मिळून 90 हजार रुपये बि बियाणे खरेदी करणण्यासाठी काढले. परंतू बॅंकेतील गर्दीचा फायदा घेवून कोणी तरी चोरट्यांनी ते 90 हजार रुपये चोरून नेले आहेत. तामसा पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 96/2025 नुसार दाखल केली आहे. पोलीस अंमलदार नागरगोजे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
तामसा येथे 90 हजार रुपयांची चोरी
