नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातून आज एक पोलीस निरिक्षक, सात पोलीस उपनिरिक्षक आणि नऊ पोलीस अंमलदार असे 17 जण सेवानिवृत्त झाले आहेत. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांनी सर्व सेवानिवृत्तांना सहकुटूंब सत्कार करून त्यांना भावी जीवनासाठी शुभकामना प्रेषित केल्या.
आज नांदेड जिल्हा पोलीस दलातील शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक जालिंदर आनंदा तांदळे, पोलीस उपनिरिक्षक दिलीप भानुदास मुंडे-बिलोली, संजय अंबादासराव जोशी, बालाजी श्रीहरी गिते-पोलीस नियंत्रण कक्ष, सुंदराजी संतराम कुकडे-पोलीस मुख्यालय, उदयसिंग रुपसिंग राठोड-स्थानिक गुन्हे शाखा, बाबुराव पुना जाधव-पोलीस ठाणे अर्धापूर, सरदार अहेमद मंजुर अहेमद शेख-सोनखेड, पोलीस अंमलदार अनुसया दादाराव बोडके-पोलीस ठाणे माहुर, देविदास बाबुराव देशमुख, धनंजय वासुदेवराव पाटील-पोलीस नियंत्रण कक्ष, सुनिल गंगाधरराव मंचलवाड-भोकर, अनिल सटवाजी मोरे-जिल्हा विशेष शाखा, पुंडलिक बालाजी घुमलवाड-गुरुद्वारा सुरक्षा पथक, संजय नारायण जोंधळे, हरी अण्णाराव शिंदे, लक्ष्मण मारोती पाटील-पोलीस मुख्यालय असे आहेत सेवानिवृत्त पोलीस अधिकारी , पोलीस अंमलदार. या सर्वांना पोलीस अधिक्षक कार्यालयातील मंथन सभागृहात आज पोलीस दलातील कामातून सुट्टी देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठ्ठे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोलीस अंमलदार रुखमिणी कामगुले यांनी केले. पोलीस अंमलदार विनोद भंडारे आणि सविता विमलवार यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
एक पोलीस निरिक्षक, सात पोलीस उपनिरिक्षक आणि नऊ पोलीस अंमलदार सेवानिवृत्त
